आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरमुळे शिवसेनेच्या नाकातोंडात गेले पाणी, जाहीरनाम्यात उल्लेख करण्यावरून साशंकता कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युती होवो न होवो, पण समांतर जलवाहिनीवरून शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी न सोडणा-या भाजपमुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे.वादातील समांतरचा उल्लेख जाहीरनाम्यात केला तर मतदारांना उत्तरे देताना नाकीनऊ येणार असल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. सुरू न झालेल्या समांतरमुळे शिवसेनेच्या नाकातोंडात पाणी गेल्याचेच हे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी जंग जंग पछाडणा-या शिवसेनेला समांतर जलवाहिनी हे अवघड जागचे दुखणे होऊन बसले आहे. युती होवो न होवो शिवसेनेवर दबाव ठेवायचा असेल तर समांतरचा विषय सतत काढत राहावा, अशी भाजपने रणनीती आखली आहे. गेल्या चार महिन्यांपासून भाजपने सेनेची या विषयावर ठरवून कोंडी केली आहे.

जाहीरनाम्यात काय करावे?
एकीकडे जनतेमध्ये समांतरबाबत असलेला राग व त्यात भाजप ओतत असलेले तेल यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे. जाहीरनामा तयार करण्यात गुंतलेल्या शिवसेनेकडून समांतरचा उल्लेख कसा केला जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्यक्षात सेनेत मात्र समांतरवरून अस्वस्थता कायम आहे. सेनेच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना समांतरचा स्पष्ट उल्लेख करून जाहीरनाम्यात विषय मांडला तर नागरिक प्रश्न विचारतील व आमचे उत्तर देताना नाकीनऊ येतील, असे मान्य करीत अडचण सांगितली.

भाजपचा हल्लाबोल
युतीबाबत भाजप, सेनेच्या बैठका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपल्या असतानाच दोनच दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी समांतरवरून हल्लाबोल चढवला. लगेच इतर नेत्यांनीही त्यांचीच री ओढत सेनेची चांगलीच अडचण केली.

पाण्याचा उल्लेख येणारच
समांतर योजना असा थेट उल्लेख न करता पाणीपुरवठा असे गुळगुळीत शब्द वापरून त्याबाबत काही आश्वासन देता येते का याबाबतही शिसेनेच्या नेत्यांची माथेफोड सुरू असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी मान्य केले आहे.
पुढे वाचा.. प्रचारासाठी आधार कार्ड, जनधनचा आधार