आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबरानगरात शिवसेनेतर्फे आठशे तुळशी रोपांचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तुळशीची जास्तीत जास्त झाडे लावा अन् पर्यावरणाचे संगोपन करा या ‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या अभियानाला शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुशील खेडकर यांनी जोरदार प्रतिसाद दिला. हिंदू जनजागरण सप्ताहानिमित्त पाऊस सुरू होताच मंगळवारी त्यांनी विभागीय क्रीडा संकुलालगतच्या काबरानगरात हजार तुळशीच्या रोपांचे वाटप सुरू केले. पहिल्या दिवशी त्यांनी ८०० रोपे महिलांना वाटली. येत्या दोन दिवसांत दोन हजार रोपांचे वाटप केले जाणार असून ही झाडे जोपासण्याची सर्वांगीण जबाबदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी ते आणखी चार हजार तुळशीची रोपे वाटणार आहेत.
या वेळी नगरसेविका सीमा चक्रनारायण, उपशाखाप्रमुख दिलीप खेकडे, उपविभागप्रमुख सुनील राऊत, उपविभागप्रमुख सुरेश शिंदे, अनिल कोंडपल्ले, जनार्दन कोत्तापल्ले, विकी वावधने, संजय पैठणकर, शाखाप्रमुख दिलीप हेगडे, शोभा दिघोळे, मीरा शिंदे, नम्रता लोखंडे, मुक्ता पांचाळ, विमल गडवे, मंगल महाजन, नीता कोत्तापल्ले, राणी चोंडिये, प्रमिला साळवे, मंगल मिसाळ आदी शिवसेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तुळशीचे रोप हाती पडताच महिलांनी हळद-कुंकू वाहून त्याची पूजा केली. कामानिमित्त अनेक महिला तसेच सदस्य घरात नव्हते. अशांच्या घरी रिक्षातून रोपे देण्यात येणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले.
९४ टक्के गुणांसाठी तुळशीचे रोपे भेट : काबरानगरातीलऋतुजा अशोक कुमावत या विद्यार्थिनीला दहावीत ९४ टक्के गुण मिळाले. तिला तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तुळशीचे रोपटे वाढव, तुला अभ्यासालाही ऑक्सिजन मिळेल, अशा शब्दात खेडकर नगरसेविका सीमा चक्रनारायण यांनी तिला आशीर्वाद दिले. पुष्पगुच्छापेक्षा हा सत्कार मोठा असल्याचे ऋतुजा म्हणाली.
पुढील वर्षी चार हजार रोपे देणार
- माझी आई दररोज तुळशीला पाणी घालते. संस्कार म्हणून ती तसे करते असे मला वाटत होते. परंतु ‘दिव्य मराठी’ने त्याबाबतची जागृती केल्यानंतर या गोष्टी पर्यावरणासाठी केल्या पाहिजेत हे मला पटले. म्हणून घरोघर तुळशीची रोपे देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त हिंदू जनजागरण सप्ताह सुरू आहे. त्यातच मला हे करायचे होते. सोमवारी चांगला पाऊस झाला म्हणून मंगळवारपासून ही सुरुवात केली. यंदा हजार तर पुढील वर्षी हजार रोपे घरोघर देणार आहे.
सुशील खेडकर, माजी सभागृह नेते.
तुळशीची झाडे जगवू
-‘दिव्य मराठी’मुळेच आम्हाला तुळशीचे महत्त्व उमगले. त्यामुळे खेडकर यांनी दिलेली सर्व तुळशीची झाडे जगवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. यातून पर्यावरण संवर्धन होईल. प्रत्येक घरासमोर तुळस दिसलीच पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. नागरिकांचीही तशीच इच्छा आहे.
सीमा चक्रनारायण, नगरसेविका, काबरानगर.
बातम्या आणखी आहेत...