आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना करणार अॅट्राॅसिटीग्रस्तांना मदत; शरद पवार, अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘अॅट्रॉसिटीकायदा रद्द करण्याची गरज नाही,’ या शरद पवार अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी निषेध केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अॅट्राॅसिटीचे गुन्हा दाखल असलेल्या प्रत्येकाला न्यायालयीन तसेच अन्य मदत केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. हे काम आपण शिवसेना म्हणून तसेच मराठा म्हणूनही करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या काही दिवसांत जिल्हाभर फिरून अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना योग्य ती मदत करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, पालिकेतील गटनेते राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे यांच्यासह खुलताबाद तालुक्यातील २२ गावांतील नागरिक उपस्थित होते. अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्याची नोंद झाल्याने काहींच्या नोकरीच्या संधी गेल्या, काहींना निवडणूक लढवता आली नाही.

केवळ गुन्हा दाखल झाल्याचा धसका घेऊन धामणगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती या वेळी ग्रामस्थांनी दिली. खिर्डी येथील आकाश हिवर्डे हा तरुण हॉटेल मॅनेजमेंटची पदविका घेऊन नोकरीच्या शोधात असतानाच त्याच्याविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याची नोकरीची संधी गेली. सात वर्षांनी तो निर्दोष सुटला असला तरी आता त्याला नोकरीची संधी नाही. अशी एकापेक्षा अनेक उदाहरणे या वेळी ग्रामस्थांनी दिली.
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे. खरेच गुन्हा घडला असेल तर नोंद व्हायलाच हवी. परंतु तसे होत नाही. खोट्या तक्रारीच दिल्या जातात. गुन्ह्याची नोंद केली नाही तर आपल्यावरही गुन्ह्याची नोंद होईल या भीतीपोटी पोलिस अधिकारीही शहानिशा करता गुन्हा दाखल करून मोकळे होतात. त्यामुळे या कायद्यातील जाचक अटी रद्द व्हायला हव्यात, अशी मागणी दानवे यांनी केली.

अॅट्राॅसिटीची तक्रार करणाऱ्याला लाखांपर्यंत शासकीय मदत मिळते. त्यामुळे काही जण शासकीय पैशासाठी तक्रारी देत राहतात. ही मदत देण्यास हरकत नाही, परंतु गुन्हा जर सिद्ध झाला नाही तर ती रक्कम सव्याज परत घेण्यात यावी, अशीही मागणी दानवे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...