आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदाराची \'दादागिरी\', संदीपान भुमरे-जयाजी सूर्यवंशी यांच्यात बाचाबाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- आमदार संदीपान भुमरे आणि जयाजी सूर्यवंशी यांच्यात भरसभेतच बाचाबाची झाली. यामुळे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळातच पार पडली. प्रकरण पार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

त्याचे झाले असे की, वेळ सकाळी अकरा वाजताची. संत एकनाथ कारखान्याचे सभास्थळ. कारखाना साईट चेअरमन तुषार शिसोदेसह सर्व संचालकांसह सदस्य हजर. परंतु माजी आमदार संजय वाघचौरे नसल्याने कोरम पूर्ण झाला नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेला अर्धा तास उशिरा म्हणजे साडेआकरा वाजता सुरूवात झाली. चेअरमन शिसोदे यांनी भाषणास सुरवात केली. ते म्हणाले सचिन घायाळ हे यंदा कारखाना सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत संत एकनाथचे संचालक आता कारखाना सुरू करण्याची तयारी दर्शवत असून येथे बिसलरीचा प्लांट उभा करणार असल्याचे सांगितले. यावर संचालक अप्पासाहेब पाटील यांनी येथे इतर प्लांट ऐवजी आधी कारखाना सुरू करा म्हणत विरोध करण्यास सुरुवात केली. त्यावर आमदार संदिपान भुमरे म्हणाले, आधी सचिन घायाळ यांचा करार रद्द करा स्वत: कारखाना चालवा असे म्हणत कामगारांचे पगार देण्याची मागणी केली. यावर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी म्हणाले, सचिन घायाळला अाधी डोक्यावर कुणी घेतले होते, असे आमदार भुमरेंना उद्देशून बोलताच भुमरेंनी हमरीतुमरी सुरू करत थेट सूर्यवंशी यांची कॉलर पकडत दोघांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे एकही ठराव घेताच सभा उधळली. याप्रकरणी भुमरे सूर्यवंशी यांनी पैठण एमआयडीसी ठाण्यात तक्रारी दाखल केल्या.

...तर राजीनामा : भुमरे :
कारखान्यावर आमदार भुमरे तुम्हीच कर्ज करून ठेवले आहे असा आरोप चेअरमन शिसोदे यानी करताच आमदार भुमरे सभेतच आक्रमक होत मी एक रुपयाचेही कर्ज केले नाही. सिद्ध करून दाखवा मी आमदारकीचा राजीनामा देईल, असे भुमरे म्हणाले.
भुमरेंचीखेळी : शिसोदे : आजजो राडा भुमरे त्यांच्या समर्थकाने केला तो पाहता कारखाना बंद राहिला पाहिजे याची खेळी आमदार भुमरे खेळत आहेत. यात मात्र कामगारांचे हाल होत आहेत असे चेअरमन तुषार शिसोदे यांनी पत्रकाराना सांगितले.

कारखान्याच्या सभेदरम्यान आमदार भुमरे- जयाजी सूर्यवंशी यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली.

पुढील स्लाइडवर वाचा, महिला पोलिसांसोबत असभ्य वर्तन भोवले, आमदार भुमरेंना झाला होता सश्रम कारावास... व पाहा इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...