आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Nationalist Congress Tough Fight In Dnyaneshwar Colony

ज्ञानेश्वर कॉलनीत राष्ट्रवादी-शिवसेनेत टक्कर, आघाडी आणि युतीत बिघाडी झाल्यास वॉर्डात चौरंगी लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका २०१० च्या निवडणुकीत मुकुंदवाडीतील ज्ञानेश्वर कॉलनीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात तिरंगी लढत होऊन राष्ट्रवादीच्या नीलाबाई जगताप यांचा निसटता विजय झाला होता. या निवडणुकीतून मनसे बाहेर पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच टक्कर होईल. मात्र, आघाडीत बिघाडी झाल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी चौरंगी लढत बघायला मिळेल. राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी शक्ती पणाला लावावी लागेल. बहुजन समाज पार्टी, एमआयएम आणि अपक्ष उमेदवार या चारही पक्षांच्या उमेदवारांना घाम फोडणार असल्याचे दिसून येत आहे.

५०.६९ टक्के मतदान : गत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ७४ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. राष्ट्रवादीच्या नीला जगताप यांना १५१४, शिवसेनेच्या मंदाबाई जगताप १३७६, मनसेच्या कविता डांगे ९९५, बसपाच्या रंजना कांबळे यांना १६६ मते मिळाली होती. उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांना २१ ते १६० मते मिळाली. ८ हजार मतांपैकी केवळ ४ हजार ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

चुरशीची लढाई : २०१५ च्या निवडणुकीत नवीन वॉर्डरचनेमुळे वॉर्ड क्रमांक ७४ हा आता ८४ झाला असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये विद्यमान नगरसेविकेचे सुपुत्र सुनील जगताप, रामनगरचे काँग्रेस नगरसेवक बाळुलाल गुजर, शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे आदींचा समावेश आहे. आघाडी झाल्यास राष्ट्रवादी व शिवसेनेत काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे.

उमेदवाराला प्राधान्य : अवैध दरू विक्री बंद करणे, रस्त्यावरील बाजार हटवणे तसेच रस्ते, पाणी, ड्रेनेज, सुरक्षा, सुविधांची ग्वाही देणा-या उमेदवाराला मतदार प्राधान्य देतील.
वचपा काढण्यासाठी
गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलाबाई जगताप यांनी शिवसेनेच्या मंदाबाई जगताप यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेकडून मंदाबाई यांचे पती कमलाकर जगताप व काँग्रेसकडून संजय जगताप यांनी उमेदवारी मागितली आहे.
पुढे वाचा..समाजवादी पक्ष उमेदवारांच्या प्रतिक्षेत