आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Divya Marathi, Aurangabad

शिवसेनेचा घामाघूम मेळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संत एकनाथ रंगमंदिरात नवीन एसी यंत्रणा बसवण्याचे काम नोव्हेंबरपासून आजपर्यंत होऊ न शकल्याने सत्ताधारी शिवसेनेचा 29 वा वर्धापन दिन पदाधिकारी व शिवसैनिकांना घाम पुसत साजरा करण्याची वेळ आली. रंगमंचावर डेझर्ट कूलर लावून मान्यवरांची सोय करण्यात आली, पण सभागृहात मात्र असह्य उकाड्यात उपस्थितांना बसावे लागले.

मनपाच्या मालकीच्या संत एकनाथ रंगमंदिराने नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली. या रंगमंदिराची अवस्था मात्र फारशी चांगली नाही. येथील एअर कूलिंग यंत्रणा जुनाट झाल्याने व दुरुस्तीनंतर या यंत्रणेच्या कर्णकटू आवाजामुळे एअर कूलिंग बंद ठेवावी लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही यंत्रणा बंद आहे. एअर कूलिंगऐवजी एअर कंडिशनिंग यंत्रणा बसवण्याबाबत नगरसेवक राजू वैद्य यांनी बरेच प्रयत्न करूनही या कामाला आजपर्यंत मुहूर्त लागलेला नाही.

परिणामी, शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेचा 29 वा वर्धापन दिन संत एकनाथ रंगमंदिरातील असह्य उकाड्यात साजरा करण्याची वेळ आली. या कार्यक्रमाला उपस्थित असणा-या खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे या मनपाशी संबंधित सर्व ताकदवान नेत्यांना घाम पुसत बसावे लागले. रंगमंचावर मान्यवरांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून डेझर्ट कूलर बसवण्यात आला होता, पण सभागृहात मात्र अशी काहीच सोय नव्हती.
एसीच्या कामासाठी 51 लाख 81 हजार 130 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून हे काम होणार आहे.
पुढे वाचा....