आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena On Waiting In Standing Committee Chairman Election

शिवसेना वेटिंगवर, एमआयएमची केवळ औपचारिकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्थायीसमिती निवडणूक इतर विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक यात भाजपने आपल्या आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत. उमेदवार विषय समित्यांचे वाटप या संदर्भात सतत पाठपुरावा करणाऱ्या शिवसेनेला शेवटच्या मिनिटापर्यंत झुलवत भाजपने आगामी काळात आपण अधिक आक्रमक होणार असल्याचे दाखवले. दुसरीकडे स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला प्रथमच आपण वेगळे पडल्याची जाणीव झाली.
ना एमआयएमला मत देता येते ना युतीकडे जाता येते अशा अवस्थेतील या दोन्ही काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तिकडे एमआयएमला संख्याबळ नसतानाही आपण विरोधी पक्ष आहोत, औपचारिकता म्हणून पडण्यासाठी का होईना लढावे लागेल याची जाणीव या निवडणुकीने दिली.
मनपा निवडणुकीतला जागावाटपाच्या चर्चेचा अंत पाहणारा अनुभव घेतल्याने शिवसेनेने शेवटी सरसकट सगळ्या पदांसाठी आपल्या पक्षांचे उमेदवारी अर्ज तयार ठेवले होते. खेचाखेचीत समित्यांचे वाटप सुरू असताना तिकडे सीताराम सुरे आरोग्य सभापतिपदासाठी अर्जही भरून आले. त्यांना अर्ज माागे घ्यायलाही सांगता आले नाही. सत्तावाटप झाले आज सुरे यांना अर्ज मागे घ्यायला लावण्यात आला. या संपूर्ण प्रकारात भाजपने शिवसेनेला वेटिंगवर ठेवण्यात यश मिळवले.
दोन्ही काँग्रेस अधांतरी
मनपाच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादीला काहीच स्थान नाही हे आज दिसले. हे दोन्ही पक्ष एमआयएमला मते देऊ शकत नव्हत. सत्ताधाऱ्यांनाही मत देऊ शकत नव्हते. शिवाय सत्ताधारी विरोधकांनाही त्यांच्या मतांची गरज नव्हती. परिणामी, ज्योती मोरे रेश्मा सिद्दिकी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या तटस्थच राहिल्या.
एमआयएमची अडचण
संख्याबळ पुरेसे नसल्याने एमआयएमचा उमेदवार केवळ औपचारिकतेसाठीच रिंगणात उतरवण्यात आला होता. एमआयएमने उमेदवारच देऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्नही केले, पण उमेदवार दिल्याने वेगळाच संदेश जाण्याची भीती असल्याने खान यांना बोहल्यावर चढवण्यात आले. त्यांना मते मिळाली.
निवडणुकीच्या काळात जागेसाठी राजकीय वैर शिगेला पोहोचतात. निवडणुका संपल्या की दुभंगलेली मने पुन्हा जुळू लागतात आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सगळे हेवेदावे बाजूला ठेवले जातात. याचाच एक भाग म्हणून बुधवारी स्थायी समिती सभापतिपदाची निवड झाली. त्यापूर्वी युतीचे नेते महापौरांच्या दालनात बसले.
जागा अपुरी पडली म्हणून एकमेकांच्या मांडीवर बसून आपला स्नेह वाढवण्याचा प्रयत्न केला. सेनेचे मोहन मेघावाले भाजपच्या किशोर नागरेंच्या मांडीवर बसले. भाजपचे गजानन बारवाल नंदकुमार घोडेलेंच्या, तर बापू घडामोडे घोडेले आणि किशनचंद तनवाणी यांच्या मांडीवर बसले.