आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena President Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीच्‍या तोंडावर अंतर्गत राजकारण, सेनेचा जिल्हाप्रमुख बदलणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीनिमित्ताने शिवसेनेत अंतर्गत राजकारण सुरू झाले असून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या जागी नवीन जिल्हाप्रमुख नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदासाठी नंदकुमार घोडेले व राजेंद्र जंजाळ यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
अंबादास दानवे व खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. या वेळी दानवे यांना गंगापूरहून तिकीट मिळाले आहे. निवडणूक होईपर्यंत नंदकुमार घोडेले यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुखाचे काम सोपवण्यात आले आहे. गंगापुरातून दानवे जिंकले तरी त्यांना पद सोडावे लागेल आणि पराभूत झाले तरी नैतिकतेच्या आधारावर त्यांचा पत्ता कापता येईल, या हेतूने पक्षातील दानवे विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणुकीनंतर आमदार प्रदीप जैस्वाल यांचे निकटवर्ती राजेंद्र जंजाळ यांना जिल्हाप्रमुख करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमेदवार म्हणून भाषण
खासदार खैरे यांनी दानवे यांना "जिल्हाप्रमुख म्हणून नाही तर उमेदवार म्हणून भाषण करा व शिवसैनिकांचे आशीर्वाद मागा' असे सांगत "आता माझी निवडणूक नसल्याने मी सगळ्यांना आदेश देऊ शकतो' असे स्पष्ट सांगितले. यावर दानवे यांनी निम्मे भाषण जिल्हाप्रमुख म्हणून केले व निम्मे उमेदवार म्हणून केले.