आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena Started The Process Of Diversification

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवसभरात तीन बैठका, शिवसेनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेतील शहरप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक यांच्या नियुक्त्या फेरबदल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून संपर्कनेते विनोद घोसाळकर या कामात गुंतले आहेत. मंगळवारी घोसाळकर यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रक्रिया सुरू झाली असली तरी नवीन निवडीसाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे घोसाळकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
स्थानिक पातळीवरील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर बदलले जाणार आहेत. परंतु जिल्हाप्रमुख तसेच शहरप्रमुखांविषयी तक्रारी असल्या तरी हे बदल आमच्या हातात नाही, मातोश्रीच त्यावर निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पदाधिकारी कसे असावेत, यावरही मंगळवारच्या बैठकांत चर्चा झाली असून अनुभवी चेहऱ्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले, तरीही भाजपने सेनेच्या काही जागा हिसकावल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी हा पक्ष प्रगती करू शकला नसल्याचे स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत सेनेला जास्त जागा होत्या. या वेळी वाॅर्ड संख्या वाढूनही जागा मात्र कमी झाल्या. तेव्हापासूनच जिल्हा तसेच शहरातील पदाधिकारी बदलले जातील, अशी चर्चा सुरू झाली होती.
घोसाळकरांकडून अहवाल घेणार : जिल्हाप्रमुख,शहरप्रमुख बदलले जातील किंवा खांदेपालटही होऊ शकतो. पण त्याचा निर्णय मुंबईतच होईल. संपर्कप्रमुख या नात्याने घोसाळकर यांच्याकडून अहवाल घेतला जाणार आहे.
अशा विकेट पडण्याची शक्यता
स्थानिक पदाधिकारी बदलल्यानंतर दोन्ही जिल्हा तिन्ही शहरप्रमुखांच्या विकेट जाऊ शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे पदांवर नियुक्ती मिळवण्यासाठी अनेकांनी फील्डिंग लावल्याची चर्चाही समोर येत आहे. असे असले तरी तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.