आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्रीवरून शिवसैनिकांना ‘आगे बढो’चे आदेश? भाजपकडून प्रतिसाद नसल्याने सेना कामाला लागली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपशी युतीची इच्छा असली तरी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेच्या वतीने स्थानिक नेत्यांना ‘आगे बढो’चे आदेश देण्यात आल्याचे समजते. गुरुवारी सायंकाळी तातडीने मुंबईला गेलेले स्थानिक नेते, पदाधिकारी शुक्रवारी सायंकाळी परतले असून पालकमंत्री रामदास कदम तसेच अन्य नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर या मंडळींनी स्वतंत्र लढण्याच्या कामाला लागावे, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. अधिकृतपणे बोलण्यास या मंडळींनी नकार दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र भाजपच्या वॉर्डातील उमेदवार निवडीचे कामही सुरू झाले आहे.

पक्षांतर्गत बैठकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर चर्चा झाली, युतीची चर्चा नंतर होईल, असे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. प्रत्यक्षात ही मंडळी सायंकाळी प्रचार कार्यालयात बसून भाजपच्या वाॅर्डातील शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करत होती, असे खात्रीलायक वृत्त आहे.

खासदार चंद्रकांत खैरे, जैस्वाल, दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, आमदार संजय शिरसाट यांच्यासमवेत गुरुवारी रात्री पालकमंत्री रामदास कदम यांनी बैठक घेतली. त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा चर्चा झाली. भाजपशी सकाळी बोलणी होण्याची शक्यता होती, परंतु तिकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना ‘ कामाला लागा’ असा आदेश देण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ही मंडळी शहरात दाखल झाली. सेनेच्या वतीने शिवसेनेला युतीत अपेक्षित असलेल्या वाॅर्डातील उमेदवारांची प्राथमिक यादी तयार असून पालकमंत्री कदम यांनी त्यावर हात फिरवल्याचे समजते. मात्र, भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने अन्य वाॅर्डातील उमेदवार निश्चित करून यादी पाठवा, असे सांगण्यात आल्याने युतीची शक्यता कमीच आहे.

पुढे वाचा... भाजप प्रदेशाध्यक्ष दोन दिवस बंगळुरूतच