आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेसाहेब तुम्ही फक्त गंगापुरात काम करू नका- शिवसेना उपनेते खा.चंद्रकांत खैरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘दानवेसाहेब तुम्ही पूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे प्रमुख आहात. त्यामुळे केवळ गंगापूरकडे पाहू नका. इतर तालुक्यांकडेही लक्ष द्या,’ असा टोला खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांना लगावला. सूर्योदय परिवार आणि शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी संत एकनाथ रंगमंदिरात एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खैरे बोलत होते. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. दानवे हे गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांनी त्या दृष्टीने कामही सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी शिवसेना आणि सूर्योदयच्या वतीने गंगापूर तालुक्यातील शेतक-यांना पाणीपुरवठ्यासाठी टँकर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसा उल्लेख अंबादास दानवे यांनी भाषणात केला असता त्याचा धागा पकडून खैरे यांनी त्यांना टोला लगावला. दानवे हे शिवसेनेचे तरुण नेते असून कुठल्याही कार्यक्र माचे योग्य मॅनेजमेंट करतात, असेही खैर म्हणाले. यावेळी विनोद घोसाळकर यांचेही भाषण झाले.
प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे भय्यूजी महाराज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, महापौर कला ओझा, नरेंद्र त्रिवेदी, नवनाथ महाराज आंधळे, सूर्योदयचे जिल्हाध्यक्ष अखिल अब्बास, नंदू घोडेले, सुहास दाशरथे, लता दलाल, सुनीता आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आलाप ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रेषित रुद्रवार यांनी सूत्रसंचालन केले.

श्रावणाचा गंध नाही
ज्यांना श्रावणाचा कुठलाही गंध नाही, त्यांनी शहरभर पाट्या लावल्या आहेत. मुद्दाम शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डात दोन-तीन लाखांचे काम करायचे आणि विकासाची गंगा म्हणून बोभाटा करायचा, अशी टीका खासदार चंद्रकांत खैरे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर केली