आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना गटप्रमुखांचे 5, 6 ऑक्टोबरला मेळावे, गटप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (7 ऑक्टोबर) होणारी जाहीर सभा तयारी व गटस्तरावर मतदार आखणीसाठी 9 विधानसभा मतदारसंघात गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शिवसेना उपनेते, खासदार चंद्रकांत खैरे मार्गदर्शन करणार आहेत.
4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता पैठण येथे संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ, दुपारी 1 वाजता फुलंब्री येथे राजेंद्र ठोंबरे यांच्यासाठी दुपारी तीन वाजता सिल्लोड येथे सुनील मिरकर यांच्यासाठी मेळावा होणार आहे. औरंगाबाद पूर्वच्या उमेदवार महापौर कला ओझा यांच्या प्रचारार्थ सायंकाळी 7 वाजता एन-6 मधील सुवर्णशिल्प मंगल कार्यालय येथे मेळावा होईल.
5 ऑक्टोबरला कन्नड येथे हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारार्थ, दुपारी 1 वाजता वैजापूर येथे आर. एम. वाणी यांच्यासाठी, दुपारी 3 वाजता गंगापूर येथे अंबादास दानवे यांच्या प्रचारार्थ मेळावा होणार आहे. सायंकाळी 6 वाजता औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी मेळावा होईल. सायंकाळी 7.30 वाजता औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचा मेळावा प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारासाठी होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
मेळाव्याला शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.