आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जय शिवराय’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध आणि जलाभिषेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात रविवारी साजरी करण्यात आली. अख्खं शहर जणू केशरी रंगाने व्यापलं होतं, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमलं होते. आपल्या लाडक्या रयतेच्या राजाच्या प्रतिकृतीला काही ठिकाणी दुग्धाभिषेक झाला तर काही ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत पुष्प्वृष्टीने झाले. आबालवृद्धांनी या जाणत्या राजाला मानाचा मुजरा केला आणि त्यांचे स्मरण केले.
 
रविवारी सकाळपासूनच शिवजयंती एका सणासारखी साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरातील गृहिणींनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या, घराघरांवर भगवा झेंडे लावण्यात आला होते. घरावर रोषनाई करण्यात आले होते. शहरातील चौका चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी शिवभक्तांनी पूजन केले.
 
या वेळी तरुणांबरोबरच, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शहरातील पारंपरिक शोभा यात्रा संस्थान गणपतीपासून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास निघाली. महापौर बापू घडामोडे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार सुभाष झांबड, उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अभिषेक देशमुख, जितेंद्र देहाडे, मनमोहनसिंग ओबेराय, विनोद बनकर, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, मनोज पाटील, अनिल मानकापे, सय्यद अक्रम, यांच्यासह विविध भागांतील नगरसेवक, राजकीय पुढारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
 
मुकुंदवाडीतएक गाव एक शिवमहोत्सव 
मुकुंदवाडीगावाने या वेळी एक गाव एक शिवमहाेत्सव ही संकल्पना साकारत एकीचे दर्शन घडवले. घरासमोर रांगोळ्या, पताकाने गाव जणू सजले होते. या भागात शहरातील सर्वाधिक उत्साह जाणवला. संध्याकाळी पाचच्या सुमारास गावातील शंकर मंदिरापासून ही मिरवणूक काढण्यात आली आणि हनुमान मंदिराजवळ समाप्त करण्यात आली. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सुमारे पाच हजार लोकांना या वेळी अन्नदान केले, तर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येणार असल्याचे आयोजक समितीने सांगितले.

शिवाजी महाराजांचा १५ फुटांचा अश्वारूढ पुतळा शोभा यात्रेसाठी आणण्यात आला होता. आमदार कल्याण काळे, नारायण कुचे, नामदेव पवार, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब डांगे, कमलाकर जगताप, ज्ञानेश्वर डांगे, रामभाऊ ढुबे, सुनील जगताप यांनी शोभा यात्रेत सहभाग घेतला होता. हनुमान शिंदे, नामदेव खरात, किशोर ढुबे, विजय पगार, दीपक खोतकर, अनिल जगताप, सचिन सांळुके, प्रवीण भुसारे यांच्यासह सकल मराठा समाज शिवयजंती महोत्सव समितीने या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. १२ मंडळांनी एकत्र येऊन हा महोत्सव साजरा केला. 

ध्वजारोहण, अभिवादन 
जिल्हाशिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात सर्व गटांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सकाळी वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील, महापौर भगवान घडामोडे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, राजेंद्र दाते पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

चित्तथरारक देखाव्यांनी अंगावर शहारे आणले 
सायंकाळीवाजता संस्थान गणपती येथून भव्य रथात शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसमोर बुलडाणा, सातारा येथून आलेल्या विविध पथकातील कलावंतांनी चित्तथरारक देखावे सादर करून सर्वांची मने जिंकली. ढाल-तलवार, दांडपट्टा, भाला, लाठीकाठी अशा शिवकालीन लढाईदरम्यानच्या युद्धकला सादर केल्या. यात मुलींची संख्या उल्लेखनीय होती. अंगावर शहरे आणणाऱ्या कलांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.  

क्रांती मोर्चाचा परिणाम 
गेल्याकाही महिन्यांपासून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या अभियानाचा परिणाम या वेळी शिवजयंती महोत्सवावर पाहायला मिळाला. या अभियानात सहभागी झालेले अनेक तरुण या वेळी महोत्सव समितीच्या आयोजनात अग्रेसर होते. 

-  टीव्ही सेंटर भागातदेखील विविध पक्ष-संघटनांनी संध्याकाळी शोभायात्रा काढली. 
- हर्सूल आणि सारा वैभव येथील तरुणांनी स्मृती उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिकृतींची स्वच्छता केली परिसरात स्वच्छता अभियान राबवले. 
- गजानन महाराज मंदिर चौकात बबन डिडोरे आणि पंजाबराव वडजे या दोन्ही गटांनी व्यासपीठ उभारून शिवजयंती साजरी केली. 
- यावेळी पोलिस आयुक्तांसह उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी असा दोन हजार पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला. 
- सावरकर चौक, उल्कानगरी, जय विश्वभारती कॉलनी या भागातही शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या. 

दुचाकी रॅलीने गजबजले 
तरुणांनीउत्स्फूर्तपणे दुचाकी रॅली काढली. गाडीला भगवा झेंडा, डोक्यावर भगवा फेटा असलेले तरुण या रॅलीत सहभागी झालेले दिसून येत होते. सकाळी नऊच्या सुमारास निघालेल्या एका रॅलीचे एक टोक जळगाव टी पाॅइंटला तर दुसरे टोक सिडको चौकात होते. 
बातम्या आणखी आहेत...