आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकाळात कधीच पडला नाही दुष्‍काळ, पाहा अशी होती मुबलक पाण्‍याची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्‍ट्रात दरवर्षी पावसाळा येतो आणि उन्‍हाळ्यात दुष्‍काळही. यंदाचा तीव्र दुष्‍काळ आपण अनुभवतो ही परिस्‍थिती केवळ एकट्या लातूर किंवा मराठवाड्यात नाही. तर, महाराष्‍ट्रातील बहुसंख्‍य गावात पाण्‍यासाठी मैलोमल भटकंती करणा-या महिला, शेतकरी शाळकरी मुलं दिसतात. हा प्रश्‍न दिवसेंदिवस एवढा भीषण होतो की, पाण्‍याला कुलुप लावून ठेवावे लागते किंवा लातूरसारख्‍या शहरात रेल्‍वेने पाणी पुरवठा करावा लागतो. थोडं मागे वळून पाहताना शिवकालिन परिस्‍थितीचा विचार केल्‍यास आपल्‍या लक्षात येईल की, महाराजांनी किल्‍ल्यांमध्‍ये पाण्‍याची मूबलक व्‍यवस्था करून ठेवली होती. महाराष्‍ट्रातील सध्‍याच्‍या दुष्‍काळाच्‍या अनुषंगाने या संग्रहात आपण शिवकालीन किल्‍ल्यांमधील पाणी व्‍यवस्‍थापनाचा थोडक्‍यात आढावा घेणार आहोत.
कसे असायचे पाण्‍याचे नियोजन....
- किल्‍ला बांधतानाच तेथे पाण्‍याची उपलब्‍ध कशी होईल हा मुख्‍य उद्देश असायचा.
- किल्‍ल्यावर मुबलक पाणी असणे मराठ्यांना संपत्‍तीसारखे वाटत होते.
- पावसाळ्यातील पाणी साठवण्‍यासाठी मोठ-मोठ्या हौदांची बांधणी केली जात होती.
- शिवाजी महाराजांच्‍या काळात रेन वॉटर हार्वेस्‍टिगची पद्धतशीर अमलबजावणी केलेली दिसते.
- राज्‍यात कितीही दुष्‍काळ असो किल्ल्यांमध्ये पाण्याची टंचाई कधीच भासली नाही.
- महाराष्ट्रात असे असंख्य गड-किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांमध्ये वर्षभर पुरेल एवढे पावसाचे पाणी साठते. शत्रूंचे वेढे वर्षानुवर्षे पडूनसुद्धा किल्ल्यावर टंचाई जाणवली नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहुया, या किल्‍ल्यांमध्‍ये अशी केली आहे पाण्‍याची व्‍यवस्‍था....