आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवाजीनगर रेल्वे गेटमध्ये बिघाड; वीस मिनिटे कोंडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रेल्वे आल्यानंतर पटरीवरील वाहतूक थांबवण्यासाठी शिवाजीनगर येथे गेट बसवण्यात आले आहे. मंगळवारी (२८ नोव्हेंबर) तपोवन एक्स्प्रेस गेल्यानंतर वायरमध्ये बिघाड झाल्याने १० मिनिटे गेट उघडलेच नाही. दुरुस्तीसाठी आणखी दहा मिनिटे लागली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनधारकांना २० मिनिटे ताटकळत थांबावे लागले. रेल्वे अभियंत्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर गेट उघडले. 

 

शिवाजीनगर येथे रेल्वे आल्यानंतर दोन्ही बाजूने गेट बंद केले जाते. मात्र काही पादचारी, दुचाकीस्वार रेल्वे येण्याच्या काही मिनिटे आधीपर्यंत गेटच्या खालून जातात. ये-जा करताना शरीराचा भार गेटवर टाकतात. त्यामुळे गेटचे वायर ओढले जाऊन मंगळवारी तांत्रिक बिघाड झाला, असे रेल्वेच्या अभियंत्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना येथे नेहमीच घडतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शिवाजीनगर, मुकुंदवाडी, संग्रामनगर, पैठण रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

दरम्यान, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रेल्वे अपघात रोखण्यासाठी देशभरातील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग लवकरात लवकर हटविण्याचे आदेश दिले होते. आता हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानुसार शिवाजीनगरला भुयारी मार्ग झाल्यास येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनधारकांना दिलासा मिळू शकतो. 

 

तांत्रिक बिघाड 
रेल्वेगेटच्या वायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडले होते. त्यादरम्यान तपोवन, नांदेडला जाणारी सचखंड रेल्वे धावली. रेल्वे गेल्यानंतर लगेच अभियंते कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली. - एल. के. जाखडे, स्टेशन व्यवस्थापक 

बातम्या आणखी आहेत...