महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात रविवारी साजरी करण्यात आली. अख्खा महाराष्ट्र जणू केशरी रंगाने व्यापला होता, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमलं होते. आपल्या लाडक्या रयतेच्या राजाच्या मूर्ती, फोटोला काही ठिकाणी दुग्धाभिषेक झाला तर काही ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत पुष्प्वृष्टीने झाले. आबालवृद्धांनी या जाणत्या राजाला मानाचा मुजरा केला आणि त्यांचे स्मरण केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, संपूर्ण महाराष्ट्रात कसा होता शिवजयंतीचा उत्साह...