आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवभक्तांनी शिवजयंती (तिथीनुसार) उत्साहात साजरी केली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता निघालेली शोभायात्रा रात्री दहा वाजेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात सुरू होती. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची महाआरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली.
दुष्काळी परिस्थिती दाखवणार्या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. बेगमपुरा येथील संभाजी क्रीडा मंडळाचे झांज पथक शिवजयंती शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव व संस्थापक अध्यक्ष काशीनाथ थोरात आहेत. संस्थान गणपती, शहागंज, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडी, पैठण गेटमार्गे क्रांती चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
मंडळाचे स्वागत करण्यासाठी चौकाचौकांत संघटना आणि पक्षांनी व्यासपीठे उभारली होती. त्यात शिवसेना, युवा सेना, राष्ट्रक्रांती संघ, भारतीय जनता पार्टी, सिटी चौक पोलिस स्टेशन यांच्याकडून शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, बापू घडामोडे, जगदीश सिद्ध, नंदू घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुहास दाशरथे, अंबादास दानवे, पृथ्वीराज पवार, जयसिंग होलिये, पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त डॉ. जय जाधव, सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी, नगरसेवक प्रफुल्ल मालाणी, प्रीती तोतला, अनिल मकरिये, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश खैरे, गजानन बारवाल, सुनीता आऊलवार, वैजयंती खैरे, गोपाळ कुलकर्णी, विकास जैन यांची उपस्थिती होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.