आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवना परिसरात सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना- अाधी पावसाचा लपंडाव, नंतर उगवलेली पिके जगवण्याची धडपड. यातून ठिबक व पावसाशिवाय इतर पाण्यावर जगवलेल्या सोयाबीन पिकावर उंट व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नव्याने संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे शिवना परिसरात पाहावयास मिळत आहे.
या भागात पहिल्यांदाच सुमारे ८३० हेक्टरवर सोयबीनची पेरणी केली होती. मात्र, ही पिके जमिनीतून डोके वर काढत नाही तोच पावसाने ४५ दिवस उघडीप दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. अशा स्थितीत पावसाचे पुन्हा पुनरागमन होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पिके वाचवण्याची धडपड सुरूच ठेवली. मध्यतंरी झालेल्या पावसाने सोयाबीनला जीवदान मिळाले. पीक बहरून त्याला फुले लागली आहेत. परंतु एेन शेंगा लागत असताना उंट व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळी पाने खाऊन टाकत पिकांचे नुकसान करत आहे. यावर शेतकरी महागडी औषधांची फवारणी करत आहे. तरीदेखील त्याचा काहीच उपयो होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त
^पावसाच्या मोठ्या खंडानंतर सोयाबीनसह मका व कपाशीची वाढ खुंटली. आता उंट अळ्यांनी पिकांवर आक्रमण केले आहे. त्यातच पावसाच्या खंडामुळे यातून किती उत्पन्न हाती येईल सांगता येत नाही. - राजू एकनाथ क्षीरसागर, शेतकरी, शिवना.
कृषितज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
^वातावरण बदलामुळे परिसरातील सोयाबीन पिकावर अळ्यांनी हल्ला केला आहे. यासाठी महागडी आैषधी न वापरता कृषितज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यानुसार पिकांचे नियोजन करून फवारणी व खतांची मात्रा द्यावी.
प्रवीण डांगरे, कृषी सहायक, शिवना.

उपाययोजना
^पाने खाणाऱ्या अळीसाठी डायक्लोरोव्हास- ७६ ईसी ५. ६४ मिली िकंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ६.६६ मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन समप्रमाणात पिकांवर फवारणी करावी. अळी असल्यास पाने तोडून टाकावी.
डॉ. संजय पाटील, कृषीशास्त्रज्ञ