आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरउन्हाळ्यात नदीला पूर, शिवना टाकळी प्रकल्पातून शिवना नदीपात्रात पाणी सोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - शिवना टाकळी प्रकल्पातून मंगळवार, 8 रोजी मध्यरात्री शिवना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी हे पाणी बायगाव-जांबरखेडा, लाखणी, सनव, देवळी, मांडकी, दिनवाडा, राजुरा, वैरागड, लासूरगाव, शहाजतपूरपर्यंत पोहोचल्याने ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जलपूजन केले. मात्र, पाण्याची गती पूर्वीपेक्षा संथ असल्याने आगाठाण येथील बंधार्‍यात पाणी पोहोचण्याची शक्यता कमी आहे. शिवना संघर्ष समितीने दोन महिन्यांपासून पाणी सोडावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळाले असून मंगळवार, 8 रोजी पाणी सोडणार असल्याचे पत्र लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते.
त्यानुसार मध्यरात्री 12.10 वाजता दरवाजे उघडण्यात येऊन प्रकल्पातील 2 दशलक्ष घनमीटर पाणी शिवना पात्रात सोडण्यात आले. या पाण्यामुळे लामनगाव, बायगाव, वैरागड, शहाजतपूर आदी गावांतील केटीवेअरच्या पाण्यामुळे पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच 20 एप्रिलपासून सुरू होणार्‍या लासूरगाव येथील देवी दाक्षायणी यात्रेच्या भाविकांना या पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती शिवना संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप पा. आढाव यांनी दिली.