आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडोझरने हटविलेले अतिक्रमण पुन्हा फोफावले, शिवना येथील तरुणांचे बांधकाम विभागाला निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना (सिल्लोड) - वर्षभरापूर्वीच्या कारवाईनंतर शिवना बसस्थान कावरील फोफावलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अतिक्रमणासोबत होणारी वाहतुकीची कोंडी फुटत नसल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. अपघातास कारणीभूत ठरणारे अतिक्रमण त्वरित हटवावे या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे.
 
जगविख्यात लोणार सरोवर व जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांना अजिंठा-बुलडाणा राज्य महामार्गावर शिवना बसस्थानकावरील अस्ताव्यस्त अतिक्रमणातून वाट काढत पुढे जावे लागत आहे. अतिक्रमणात हरवलेल्या या रस्त्यावर वाहतूकीला अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याआधी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या माध्यस्तीने हे अतिक्रमण बुलडोझरने हटविण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच अतिक्रमण पुन्हा फोफावले आहे. अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी येथील नागरिकांनी संबंधित विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...