आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराईच्या बायोगॅस पॅटर्नची राज्यात नोंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व पंचायत समितीच्या पुढाकारातून गावस्तरावर घरगुती इंधननिर्मितीसाठी आधुनिक प्रणालीच्या अनुदान तत्त्वावरील राष्‍ट्री य बायोगॅस प्रकल्प योजनेत जिल्ह्यातून शिवराई गावाने सक्रिय सहभाग घेत गावात 70 बायोगॅस संयंत्रांची उभारणी केली आहे. त्यामुळे गावाची
बायोगॅस पॅटर्न म्हणून शासन स्तरावर विशेष नोंद घेण्यात आली आहे.

पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या शिवराईत केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत राष्‍ट्री य बायोगॅस योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, कृषी विभागाचे एच. आर. बोयनर आणि या गणाच्या पंचायत समिती सदस्या लहानुबाई डिके, सरपंच संजय आहेर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सारंगधर डिके, नानासाहेब चव्हाण आदींसह ग्रामस्थांची बैठक घेऊन घरगुती इंधननिर्मिती तसेच शेताला सेंद्रिय खत. अशा सुविधा या प्रकल्पातून सहजपणे उपलब्ध होईल. आर्थिक खर्चाची बचतही होईल, असे पटवून सांगितले.
सुरुवातीला पाच शेतक-या नी अनुदान तत्त्वावरील आधुनिक बायोगॅसची उभारणी केली. प्रकल्पातून या शेतक-या ना घरगुती स्वयंपाकासाठी मुबलक प्रमाणात गॅस तसेच शेतीला उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तर काही लाभार्थींनी या प्रणालीवर घरात विद्युत दिवे सुरू केले.

लाभार्थींना अनुदान
राष्‍ट्री य बायोगॅस योजनेच्या लाभार्थींना प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत 8 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, असे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले.

गावात सिलिंडरचा वापर घटला
शिवराई गावात बायोगॅस प्रकल्प उभारणीत ग्रामस्थांनी पुढाकाराची भूमिका घेतल्यामुळे प्रकल्पधारकाला दररोज दोन घनमीटर गॅस सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे सरकारच्या सबसिडीअंतर्गत मिळणा-या एलपीजी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठीची ओढाताण गावात कमी झाली आहे.
लहानुबाई डिके, पंचायत समिती सदस्या