आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Aurangabad Branch Anniversary Celebration

महिलांनो, चरित्र आणि चारित्र्य जपा, राजकारणातील महिलांना लता दलाल यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महिलांनी चरित्र आणि चारित्र्य जपले तरच राजकारणात आगेकूच करता येईल. तसेच चौफेर ज्ञानवृद्धी करणेही आवश्यक आहे, असा सल्ला माजी उपमहापौर लता दलाल यांनी दिला.

शिवसेनेच्या वतीने रविवारी (9 जून) संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ‘महिलांचे संघटनेतील महत्त्व व जबाबदारी’ या विषयावर दलाल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 74 व्या घटनादुरुस्तीमुळे 50 टक्के आरक्षण मिळाले आहे, पण लोकसभा व विधानसभेत योग्य स्थान मिळालेले नाही. त्याला कारण महिलांचे अज्ञान आहे. कसे राहावे, बोलावे, पोशाख कसा असावा याबाबत महिलांनी दक्ष असायला हवे. पद भूषवण्यासाठी नव्हे, तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊन तेथील नागरी समस्या सोडवता आल्या पाहिजे. केवळ बैठकीला जाऊन बसू नये. बैठकीत आपले प्रo्न कौशल्याने मांडावेत. पद मिळत नाही म्हणून रडत बसू नका, पद का मिळत नाही याची कारणे शोधा. आर्थिक परिस्थिती बरोबर नसतानाही पुरुष राजकारणात जम बसवतात. त्याच धर्तीवर महिलांनी आपला जम बसवला पाहिजे, असेही दलाल म्हणाल्या.

आदराने बोला, सन्मानाने वागा : ज्योती पत्की
राजकारणात महिलांनी काही पथ्ये पाळायलाच हवी. आपले बोलणे हे आदरयुक्त, वागणूक सन्मानाची असावी. वाईट बोलले तर लोकांचा दृष्टिकोन बदलतो. संघटन कौशल्य चांगले असावे. महिलांसाठी कायदेविषयक शिबिर, बचत गटाच्या माध्यमातून स्वालंबन आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. नवीन महिला संघटनेत आल्या तर त्यांना दुजाभावाची वागणूक न देता स्नेहाची साथ दिली जावी. राहणीमान, बोलण्याची पद्धती व वागणूक चांगली ठेवणे नितांत गरजेचे आहे, असे मत माजी न्यायदंडाधिकारी ज्योती पत्की यांनी व्यक्त केले.

विकासकामात विरोधकांचा अडथळा : महापौर ओझा
शहर रस्ता रुंदीकरणासाठी शासनाकडे शंभर कोटींची मागणी केली होती. ती त्यांनी पूर्ण केली नाही. मलेरिया कर्मचार्‍यांचे वेतन शासनाने द्यायला हवे, पण ते मनपा प्रशासनास द्यावे लागते. शाळेचे भाडे थकीत आहे. अधिकार्‍यांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे अकुशल अधिकार्‍यांच्या ज्ञानाचा मनपाला फारसा फायदा होत नाही. सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या दृष्टीने सभागृहाचे कामकाज चालायला हवे, पण गत चार सर्वसाधारण सभेत विरोधक केवळ गोंधळ घालत आहे. समांतरमध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप केला जात आहे. समांतरमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. खासदार खैरे यांनी केंद्र शासनाकडून महत्त्वाकांक्षी समांतर योजना मंजूर करून आणली. उच्च व तंत्रशिक्षण राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात पाणी नेण्यासाठी 13 कोटी मंजूर करून ते काम जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येत आहे. आम्ही विकास करतो त्याला सर्वस्तरावर ते विरोध करून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनपा बरखास्तीची मागणीही केली जात आहे. कशासाठी मनपा बरखास्त करायची? एलबीटीतून उत्पन्न सुरू झाले आहे. सर्व व्यवस्थित असताना केवळ आरोप होत आहेत. यामुळे काम करताना अडचणी येतात. याला उत्तर देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा महापौर कला ओझा यांनी व्यक्त केली.

तनवाणी, जैस्वालांचा ओझांना दिलासा
आमदार किशनचंद तनवाणी यांनी महापौरांना दिलासा देत म्हटले की, ‘तुम्ही निधीची अपेक्षा करू नका. इतर कोणी महापौर असता तर शासनाकडून भरघोस निधी मिळाला असता, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत.’

लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी
‘सर्वसाधारण सभेत नियमाप्रमाणे अध्र्या तासाच्या वर चर्चा करता येत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा. लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहेत.’ प्रदीप जैस्वाल, आमदार