आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - उत्तर प्रदेश सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आपल्यापेक्षा निम्मा अर्थसंकल्प असताना त्यांना कर्जमाफी देणे शक्य झाले, तर मग महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी देणे का शक्य होत नाही.
 
भाजपचे नेते विरोधी पक्षात होते तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत होते. मग आता हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तेवढे ३०२ चे गुन्हे मुख्यमंत्र्यांवर दाखल करावे, असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. १६) लासूर स्टेशन येथे झालेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी व्यक्त केले.  

शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, मागील तीन वर्षांचा पीक विमा द्यावा, धान्याची खरेदी शासनाच्या हमी भावानुसार झाली पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी लासूर स्टेशन बाजारपेठेतील आठवडी बाजार परिसरात शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.  
 
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  दानवे, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष माने, पंचायत समिती उपसभापती संपत छाजेड, माजी सभापती संजय जैस्वाल, मच्छिंद्र पाटील देवकर, संजय जैस्वाल, दिनेश मुथा, अनिल जाधव, प्रकाश परोडकर, दादासाहेब कापसे, सुभाष नरोडे, योगेश मापारी, संदीप आढाव, बाबासाहेब सोमासे, सुनील केरे, जयदेव जाधव, नारायण ठोळे, भाऊसाहेब गाडेकर, कमलेश राजपूत, योगेश क्षीरसागर, विनायक चव्हाण, नितीन कांजुने, कारभारी वंजारे, योगेश गायके, रामहरी चव्हाण आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारचा लासूर स्टेशन येथील सर्वांत मोठा आठवडी बाजार असल्याने  शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बातम्या आणखी आहेत...