आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुण्यासारखे नीट वागा, अन्यथा रुमणे हातात घेऊ; मानेंची अंबादास दानवेंना धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यावरून शिवसेनेतील धुमशान दिवसेंदिवस पेटत चालले आहे. पाहुण्यांनी पाहुण्यांसारखे राहावे, घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यास रुमणे हातात घ्यावे लागेल, अशी उघड धमकी माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना दिली. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली.
दानवे हे गंगापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांची तयारीही सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावरूनच माने यांनी दानवेंना ही धमकी देऊन त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. मानेंचे हे रौद्ररूप पाहून शिवसैनिकांसह सर्वच जण अवाक् झाले. अध्यक्षस्थानी आमदार आर. एम. वाणी होते. दानवेंच्या भाषणानंतर माने बोलण्यास उभे राहिले. दानवे जिल्हाप्रमुख झाल्यापासून गंगापूर पंचायत समिती व वैजापूरच्या आमदारांचा निसटता विजय वगळता जिल्ह्यात ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका हातातून गेल्या आहेत. याला काय म्हणावे, असा सवाल करत माने यांनी दानवे यांनी घेतलेल्या शेतकरी मेळाव्याला राजकीय वास येत असल्याचाही आरोप केला. अध्यक्षीय समारोपात वाणी यांनी मानेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.