आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना पदाधिकार्‍यांची दानवेंविरुद्ध थेट मातोश्रीवर तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघासाठी संदिपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेनेतील इतर इच्छुकांची मोठी अडचण झाली. शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचा दानवेंना अधिकार नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील ती सर्वांना मान्य असेल, असे येथील पदाधिकार्‍यांचे मत आहे. बुधवारी शिवसेनेचे पैठण तालुकाप्रमुख विजय जाधव, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, सोमनाथ परदेशी यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांची भेट घेऊन दानवे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झालेल्या वृत्ताची प्रत मातोश्रीवर पाठवून दानवेंची तक्रार केली. मित्रपक्षाच्या नेत्यांनी पक्षांतर्गत बाबींकडे लक्ष घालू नये, अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली आहे.