आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांना आवरण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना भाजपने युती करून मनपाची सत्ता ताब्यात घेण्याची डरकाळी फोडली असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार बंडखोरांमुळे हैराण झाले आहेत. भाजपच्या काही उमेदवारांनी तर आज पक्षाच्या बैठकीत बंडखोरांना आवरा हो, अशी विनवणी केली आहे.


महापालिका नविडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षांत भरमसाट संख्येने असलेल्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. यंदाची बंडखोरी तर अधिकच तीव्र बनली आहे. सेना भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात त्यांच्याच पक्षांचे बंडखोर आहेतच, शिवाय एकमेकांच्या पक्षांचेही बंडखोर आहेत. त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. आता तर चिन्ह मिळाल्यावर या बंडखोरांनी प्रचाराला सुरुवात केल्याने पक्षांचे अधिकृत उमेदवार अस्वस्थ बनले आहेत.

भाजप कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना संघटनमंत्री रवींद्र भुसारी. या वेळी डावीकडून अनिल मकरिये, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, विजया रहाटकर, किशनचंद तनवाणी, ज्ञानोबा मुंडे, आमदार प्रशांत बंब आदींची उपस्थिती होती.

आवरा हो आवरा
भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. त्यात हाच विषय काही उमेदवारांनी मांडला. नविडणुकीत युती झालेली असताना भाजपला सुटलेल्या अनेक वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे, तर काही वॉर्डांत शिवसेनेचा बंडखोर नसताना तेथे शिवसेनेचे पदाधिकारी भाजप उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. त्यामुळे "बंडखोरांना आवरा' अशी मागणीच उमेदवारांनी केली. { या बैठकीस भाजपचे सरचटिणीस सुजतिसिंह ठाकूर, संघटनमंत्री रवींद्र भुसारी, आमदार अतुल सावे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, संजय केणेकर, किशनचंद तनवाणी, प्रवीण घुगे, अनिल मकरिये उपस्थिती होती.

खात्रीच्या जागांना धोका
शहरातल्या उल्कानगरी, हर्सूल, मयूर पार्क अशा भाजपच्या मते विजयाची खात्री असलेल्या जवळपास १५ ते २० वॉर्डांत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. याबाबत लवकरच शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.

सेनेला घरातूनच आव्हान
शिवसेनेचीस्थितीही भाजपपेक्षा वेगळी नाही. त्यांना तर अनेक ठिकाणी घरातूनच कडवे आव्हान असल्याने अनेक जागा अडचणीत आल्या आहेत. ज्या जागेसाठी शिवसेनेने युती पणाला लावण्याची तयारी केली होती त्या गुलमंडीवर खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना शिवसेनेच्याच पप्पू व्यास यांच्या बंडखोरीचा ताप होत आहे. पदमपुऱ्यात गजानन बारवाल यांनीच बंडखोरी केली आहे, वदि्यमान नगरसेविका सुनीता बरथुने यांचे पती भरत बरथुने यांनीही बंडाचा झेंडा उभारला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात भाजपच्या बंडखोरांचेही तगडे आव्हान आहे. महापौर कला ओझा यांची बाळकृष्णनगरात भाजप बंडखोराशी झुंजताना अडचण होणार असल्याचे सेना नेत्यांचेच म्हणणे आहे.
पुढील स्लाईडवर, भाजपच्या मेळव्यात जादूचे प्रयोग सादर करण्यात आले.