आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे नगरसेवक चांगले; अधिकाऱ्यांमुळे शहर बिघडले, काही रस्ते, विकासकामांच्या पाहणीनंतर सेना आमदारांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नक्षत्रवाडी येथील मलनिस्सारण शुद्धीकरण केंद्रची पाहणी करताना शिवसेनेचे पदाधिकारी. - Divya Marathi
नक्षत्रवाडी येथील मलनिस्सारण शुद्धीकरण केंद्रची पाहणी करताना शिवसेनेचे पदाधिकारी.
औरंगाबाद- कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक होऊ शकते, त्यामुळे आपला जनसंपर्क वाढला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली. त्यानुसार मुंबईतील तीन सेना आमदारांनी शनिवारी शहरात येऊन काही भागांची पाहणी केली. सायंकाळी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्यावर सूचनांचा पाऊस पाडला. शिवसेनेचे नगरसेवक चांगलेच आहेत. अधिकाऱ्यांनीच शहर बिघडवले, असा दावा त्यांनी केला. खड्डे असो की अन्य समस्या अधिकाऱ्यांना त्या दिसतच नाहीत, असे ते म्हणाले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी समांतर जलवाहिनीचे काम मार्गी लावा, असे फर्मानही त्यांनी आयुक्तांना सोडले. 
संपर्क नेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार नागेश पाटील आष्टीकर, सुनील शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत नारेगाव कचरा डेपो, हडको तसेच नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प, पैठण रस्ता, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे संग्रहालय, हर्सूल तलावाजवळील जांभूळबन, एमजीएम येथील नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. पाहणी दौऱ्याचा अहवाल रविवारी उद्धव ठाकरेंकडे दिला जाणार आहे, अशीही माहिती या वेळी देण्यात आली.
 
हे करण्यास सांगितले 
१. पाणीपुरवठ्याचे नियोजन, 
२. समांतरचे काम सुरू करून नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी, 
३.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने लोकांकडून घेतलेले पैसे परत मिळवा, वॉर्डातील कचऱ्याची वॉर्डातच विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करा, 
४. १५० कोटींच्या रस्त्यांसाठी आतापासूनच नियोजन करा, 
५. कर आकारणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा. कर भरणा टाळणाऱ्यांपर्यंत जावे, 
६. पाणीपट्टी भरणाऱ्यांना दंड करावा. 
७. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. 
 
गती दिल्याचे चित्र दाखवण्यासाठी 
शनिवारी सेनेच्या शिष्टमंडळाने ज्या कामांची पाहणी केली. त्यातील बहुतांश कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत. या कामांसाठी प्रशासनावर तुटून पडा, असेही निर्देश नगरसेवकांना आहेत. त्यामुळे रखडलेल्या कामांना सेनेमुळेच गती मिळाली, असे चित्र निर्माण करायचे यासाठी हा दौरा असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. यावरून सेना-भाजप असाही वाद रंगू शकतो. 
बातम्या आणखी आहेत...