आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंवर टीका करणाऱ्या आमदार जाधवांनी उचलली न केलेल्या कामाची बिले, शिवसेनेची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निधीतून कामे होताच फक्त बिले उचलली गेली, असा आरोप करणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या पिशोर गावात १९ कामे कागदावर झाल्याचे दाखवून फक्त बिले काढल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. १४ ऑगस्टला झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत सदस्यांनी प्रस्ताव घेऊन १९ कामे झालीच नसल्याचे म्हटले आहे. त्यातील काही कामे खासदार निधीतून पूर्वीच झाली होती, असे स्पष्ट केले. याची चौकशी करावी, अशी मागणी त्रिवेदी यांनी केली. 

आमदार जाधव यांनी २४ एप्रिल २००४ ला ग्रामविकास मंत्री दादाजी भिसे यांना पत्र लिहून ३४ कामांसाठी प्रत्येकी लाखांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला. त्यातील १९ कामे झालीच नाहीत. मात्र, बिले उचलण्यात आली. बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्यात आली होती. त्रिवेदी यांनी या विभागाला पत्र देऊन बिल उचलण्यात आल्याबद्दल विचारणा केली होती. १५ कामांसाठी ४२ लाख ९० हजार ७७९ रुपये देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंत्याने स्पष्ट केले. त्यानंतर त्रिवेदी यांनी पिशोर ग्रामपंचायतीला कळवले. पिशोर गावात १९ कामे झाल्याचे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात ही १९ कामे झालीच नसल्याचे ग्रामपंचायतीने १४ ऑगस्टला झालेल्या ठरावात स्पष्ट केले. यातील तीन कामे तर पूर्वीच खासदार निधीतून झाल्याचे ठरावात म्हटले आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण या शीर्षकाखाली ही कामे करण्यात आली आहेत.

ही कामे ग्रामविकास मंत्रालयाची 
ही कामे आमदार निधीतील नव्हे तर ग्रामविकास मंत्रालयाची आहेत. त्यातील एकही काम माझ्या सहीने झाले नाही. ग्रामपंचायतीने यासंदर्भात केलेला ठरावही वैध नाही. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे. 
- हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड 
बातम्या आणखी आहेत...