आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन सुरू; मुलाखतींना ‘इव्हेंट’ बनविण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा शुभारंभ शक्तिप्रदर्शनाने करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. अन्य पक्ष बंद खोलीत उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना शिवसेनेने त्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची निवड केली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. हा कार्यक्रम एक इव्हेंट ठरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्हाभरातून इच्छुक समर्थकांसह मुलाखतीसह दाखल होत असल्यामुळे मोठी गर्र्दी होते. ती टाळण्यासाठी बहुतांश पक्षांनी तालुकानिहाय वेळ देऊन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले, त्याच्या उलट निर्णय शिवसेनेने घेतला. जिल्ह्यातील उमेदवार, त्यांचे समर्थक यांची वाहने मिळून सांस्कृतिक मंडळाचे मैदान ओसंडून वाहणार याचा अंदाज आल्याने मुलाखतीचा इव्हेंट ठरविण्याचा प्रयत्न सेनेकडून करण्यात येत आहे. मुलाखतीबरोबरच शक्तिप्रदर्शन असा दुहेरी कार्यक्रम शिवसेनेने आखल्याचे दिसते.
सांस्कृतिक मंडळाला राजकीय इतिहास - मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला एक राजकीय इतिहास आहे. शिवसेनेच्या मराठवाड्यातील विजयाचा पाया याच मंडळावर रोवला गेला. या मैदानावरच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा ऐतिहासिक ठरल्या. त्यामुळे मुलाखतींसाठी आम्ही याच मंडळाची निवड केली. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण पडणार नाही. मोटारीही तेथेच उभ्या राहू शकतील. मुलाखती हा एक इव्हेंट असतोच. त्यात वेगळे काय.’’ - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख.