आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खैरे, जैस्वाल, शिरसाटांच्या नावाचे कुंकू लावू नका; उद्धव ठाकरे यांची गटबाजीवर नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खैरे, जैस्वाल किंवा शिरसाट यांच्या गटातील व्यक्ती म्हणजे गटप्रमुख, अशी व्याख्याच जणू झालेली दिसते. हा प्रकार चुकीचा असून सर्वप्रथम तुम्ही सर्वजण शिवसैनिक आहात ही बाब न विसरता खैरे, जैस्वाल किंवा शिरसाट यांच्या नावाचे कुंकू कपाळी लावू नका, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्या वतीने शनिवारी र्शीहरी पॅव्हेलियन, शहानूरवाडी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. व्यासपाठीवर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वालही उपस्थित होते. उपनेते अनिल देसाई, सुभाष देसाई, संपर्क नेते विनोद घोसाळकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, लक्ष्मणराव वडले, महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि नरेंद्र त्रिवेदी आदी उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवातच गटप्रमुख म्हणजे काय, या शब्दाने केली. खैरे, जैस्वाल आणि शिरसाट यांचे शहरात गट असल्याचा उल्लेख त्यांनी केला. खासदार खैरे हे निष्ठावान शिवसैनिक असून त्यांनी निष्ठावंतांची फौज तयार केल्याचे या वेळी आवर्जून सांगितले.

दुर्गा शक्तींना शिक्षा कशासाठी ?
उत्तर प्रदेशमधील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई पूर्णत: चुकीची आहे. त्यांची चूक असेल तर कारवाईसाठी एक पद्धत असते. केवळ मशीद पाडली म्हणून ही शिक्षा दिली. तेथे मंदिराची भिंत पाडली म्हणून अशी शिक्षा या सरकारने दिली असती का, असा सवालही त्यांनी केला.

पुन्हा हिंदुत्व आणि संभाजीनगर
शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्व सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगतानाच औरंगाबाद शहराचे पुन्हा ‘संभाजीनगर’ असे नामकरण केले जाईल, असेही ठामपणे सांगितले. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. कोणत्याही परिस्थितीत यापासून दूर जाणार नाही. आम्ही सहिष्णू नक्कीच आहोत, पण मूळ मुद्दय़ापासून दूर जाणार नाहीत.