आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांकडे गार्‍हाणे: पदाधिकारी बिनकामाचे, तुम्हीच कामे करा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि पक्ष यांच्यात ठिणगी उडाली आहे. आमचे पदाधिकारी सक्षम नाहीत, असे गार्‍हाणे थेट आयुक्तांना सांगत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मनपातील पदाधिकार्‍यांना डावलून आज आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख व तीन शहरप्रमुखांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळाने या मागण्या महिनाभरात पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आणि पुढच्या महिन्यात याच विषयावर पुन्हा भेटू, असा इशाराही दिला.
विकासकामे ठप्प झाली आहेत, असे चित्र असल्याने मनपातील स्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकार्‍यांना चाप लावण्यासाठी शिवसेनेने पक्ष संघटना कामाला लावली. पदाधिकारी आणि नगरसेवकांना न भेटता, त्यांच्या दालनात न जाता थेट मनपा आयुक्तांना भेटून पक्ष पदाधिकार्‍यांपेक्षा मोठा आहे असे संकेत त्यांनी दिले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख संतोष जेजूरकर, रेणुकादास वैद्य, बाळासाहेब थोरात, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, उपसंघटक सुनीता देव, माधुरी जोशी, सविता कुलकर्णी आणि इतर पक्ष पदाधिकार्‍यांनी सोमवारी दुपारी मनपा मुख्यालय गाठले. महापौर कला ओझा, सभागृह नेते सुशील खेडकर मनपात उपस्थित होते. पदाधिकारी आपल्याकडे येतील याची ते वाट पाहत होते, मात्र हेतूपुरस्सर त्यांना टाळत शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. तीनपानी निवेदन दिले, या वेळी दानवे यांनी रस्त्याच्या विषयावर नागरिकांचा संताप वाढला आहे याकडे लक्ष वेधले. महापौरांच्या वॉर्डात सहा कोटींची कामे झाली असे म्हणण्याला अर्थ नाही. जनतेची निकड लक्षात घेऊन रस्त्यांची कामे करावीत. नागरिकांना त्रासदायक ठरणारे रस्ते तातडीने करा. मग ते कोणाच्याही वॉर्डात असोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यात पदाधिकारी कमी पडत आहेत, म्हणून पक्ष या नात्याने लक्ष घालावे लागत असल्याचे दानवे यांनी सांगितले.
ही आहेत मूळ कारणे
>रस्ते, पाणी आणि विकासकामे होत नसल्याने नागरिकांचा शिवसेनेबद्दल रोष वाढत आहे.
>जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पदाधिकारी आपापलीच कामे करून घेतात, असे चित्र आहे.
>महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत पक्षाच्या नेत्यांना विचारात न घेता केलेल्या दौर्‍यांमुळे संघर्ष