आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचे वाटेकरी अन् विरोधक भारनियमनाविरुद्ध एकवटले, शिवसेना, एमआयएमचे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऊर्जा मंत्रीहाय हाय...लोडशेडिंग तत्काळ बंद करा..अशा घोषणा देत सत्तेत भागीदार असलेली शिवसेना आणि विरोधक एमआयएमने शनिवारी सकाळी मिल कॉर्नर येथील महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. घोषणाबाजी सुरू असताना पोलिस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांत झटापट झाली. मात्र, आमदार इम्तियाज जलील यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. 
 
मिल कॉर्नर येथील महावितरणच्या कार्यालयात शिवसेना आणि एमआयएमचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता दाखल झाले. शिवसैनिकांनी भगवे झेंडे बॅनर आणले होते. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करत दुचाकी, चारचाकी वाहनांनी हा परिसर ठप्प केला. गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शिवसैनिकांना जास्त संख्येने आता सोडल्याचे पाहून ‘ऊर्जामंत्री हाय हाय’च्या घोषणा देत एमआयएमचे कार्यकर्ते भिंतीवर चढले. पोलिसांनी त्यांना अडवले. आमदार इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचा सल्ला दिला. या वेळी अनेक जण कंपाउंड वॉलवरून घसरून खाली पडले. यात काही फोटोग्राफरचा समावेश होता. पोलिसांनी सर्वाना शांततेचे आवाहन केले. दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने आत जाऊन निवेदन देण्याचा आग्रह धरला. तेव्हा आमदार इम्तियाज काही कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंता गणेशकर यांना भारनियमन तत्काळ बंद करा, या मागणीचे निवेदन दिले. 
 
आता विभाग निहाय आंदोलन : शिवसेनेचेजिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, आम्ही भारनियमन बंद करण्याची मागणी केली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी हैराण आहे. दोन दिवसांत हा निर्णय झाला नाही तर महावितरणच्या कार्यालयावर विभागनिहाय आंदोलन करण्यात येईल. 
 
दोनशेवर शिवसैनिकांचा सहभाग 
आंदोलनात सुमारे दोनशेवर शिवसैनिक सहभागी झाले होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या वेळी संतोष जेजूरकर, बंडू ओक, राजू राठोड, अनिल पोलकर, गणेश चोपडे, राजेंद्र अदमाने, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी, कला ओझा, सुनीता आऊलवार उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...