आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलंकित मंत्र्यांचे पुतळे जाळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेची मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील भ्रष्ट 18 कलंकित मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी 28 फेब्रुवारीला औरंगाबाद येथे शिवसेना करणार आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी आघूर येथे आयोजित पदाधिकार्‍यांच्या पक्ष मेळाव्यात दिली.

या वेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर राऊत, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गलांडे, कल्याण जगताप, किसान सेनेचे गोटुसिंग राजपूत, शहर प्रमुख प्रकाश चव्हाण, उपशहरप्रमुख शिवलिंग साखरे, उपतालुकाप्रमुख सजन शिंदे, युवा सेनेचे अमीर अली, कय्युम सौदागर, बशीर सौदागर उपस्थित होते. वैजापूर शहरात तीन सामाजिक सभागृह, धोंदलगाव, लोणी बु, आघूर येथील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

ते म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता फसवणूक केली आहे. येत्या निवडणुकीत जनतेला भूलथापा मारणार्‍या सरकारची सत्ता भुईसपाट करून महायुती सत्ता परिवर्तनाची घडी बसवणार आहे, असे सांगत राज्यातील कायम दुष्काळाग्रस्त भागात समावेश असलेल्या वैजापूर, गंगापूर तालुक्यांचा दुष्काळ सेनेने दूर केला. या दोन्ही तालुक्यांची सर्वाधिक सिंचन क्षेत्राचा भाग म्हणून नवीन ओळख आपल्या कृतीतून केली. काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकात तंटे होत आहेत.

राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री भांडणाचा कित्ता गिरवत असल्यामुळे 2014 ला आपल्याला हे चित्र बदलायचे आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सत्ताधारी आमदारापेक्षा 2012-13 या वर्षात वैजापूर विधानसभा मतदारसंघासाठी रस्ते, सिंचन आदी विकासकामांसाठी 97 कोटी 46 लाख 17 हजारांचा वाढीव निधी मंजूर करून घेतला, असेही वाणी यांनी मेळाव्यात सांगितले.

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक शिवसेना, संघटन, विकास आदी विचार हा प्रमुख मुद्दा घेऊन लढणार आहे. ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांनी मतदार यादीचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख रमेश बोरनारे यांनी केले. या मेळाव्यास मोठय़ा संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.