आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व, ७२ मतदारांनी केले मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - आमदार संदिपान भुमरे व माजी आमदार संजय वाघचौरे यांनी खरेदी-विक्री संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीला महत्त्व आले होते. मात्र, खरेदी-विक्री संघावर कायम वर्चस्व राहिलेल्या भुमरे यांची सत्ता कायम राहिली आहे. १७ जागांपैकी १७ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून वाघचौरे गटाचा सुपडासाफ झाला आहे. त्यांना एकाही जागेवर उमेदवार निवडून आणता आला नाही.

या निवडणुकीत एक हजार ६२ पैकी ९३५ जणांनी वैयक्तिक मतदानाचा हक बजावला, तर सोसायटी मतदारसंघातून ७२ पैकी ७२ मतदारांनी मतदान केले. केंद्राबाहेर शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह विनोद तांबे, अनिल हजारे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी शेतकरी सहकार खरेदी -विक्री संघाच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले होते, परंतु या निवडणुकीत वाघचौरे गटाच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. वाघचौरे गटातून सहकार संस्था प्रतिनिधी म्हणून तुकाराम इंगळे (२६), श्रीकांत तरमळे (२६), रमेश नवले ( २७), सुरेश बोडखे (२६), बाबासाहेब राऊत (३१), कैलास वाघचौरे (३०), शेख सलीम शेख हबीब (२४) तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधी म्हणून भरत बोबडे (२४६), महेश बोंबले (२६८), राधाकिसन म्हस्के (२२४), रियाज सय्यद मीर सय्यद (२१७), फकीरचंद घेवारे (१४) तर महिला प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री तांबे ( २५५), मंदाकिनी मुळे (२३) व अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी म्हणून बबन सोनवणे ( २५७) तसेच इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून विजय गोरे ( २७६) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मधून भिकन भालेकर (२५०) हे निवडणुक रिंगणात उभे होते. परंतु त्यांना मतदारांनी जास्त प्रमाणात कौल न दिल्याने यांचा पराभव झाला.

विजयी उमेदवार
पैठण येथील शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या २०१५ च्या निवडणुकीत आमदार संदिपान भुमरे यंाच्या पॅनलचे सहकारी संस्था प्रतिनिधीमध्ये संतोष खराद (४३), भागवत गिरगे (३८) प्रभाकर फादांडे (४१), अंकुश बोबडे (४०), भाऊसाहेब मोरे (४२), बप्पासाहेब वाघ (३९), गोविंद वाघ (३७), तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधीमध्ये बळीराम औटे (६७४), शिवाजी काकडे (६३१), संतोष तांबे (६५३), बाबूराव पडुळे (६३८), गणपतराव माने (५८८) व महिला राखीव प्रतिनिधीमधून लताबाई तांबे ( ६८६), वर्षा भुमरे (७०२) आणि अनुसूचित जाती -जमाती प्रतिनिधी महणून अंकुश म्हस्के (७२९), तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून बबन ठाणगे (७०७) तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातून बंडू गाढे (७४२) मतांनी विजयी झाले आहेत.