आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंची हकालपट्टी करा : शिरसाट, जैस्वाल,माने त्रिवेदींनी मिळवला सुरात सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गटबाजीला खतपाणी घालून हुकूमशाही करत असल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दानवे यांनी सांगितले की, शिरसाट यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. मी सर्वांना सोबत घेऊनच काम करतो.
शिरसाट शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, माझ्यामुळे संघटना चालते, असा दानवेंचा भ्रम झाला असून या विषयाचा आता सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. दानवे स्वत:चे आपले कार्यक्षेत्र सोडून सगळीकडे हस्तक्षेप करतात. मनपा क्षेत्राची जबाबदारी महानगरप्रमुखांकडे असताना तेथेही लुडबुड असते. ज्या देवगिरी नागरी सहकारी बँकेत शिवसेनेचे मतदार नाहीत. ती निवडणूक आपण कधीच लढवली नाही. तेथे केवळ संघाला त्रास देण्यासाठी निवडणूक लढवायला कुणी सांगितले होते, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे विदेश दौऱ्यावरून परतल्यावर १८ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जैस्वाल म्हणाले की, कोणाची काय ताकद आहे ते लोकांना माहीत आहे. त्रिवेदी यांनीही दानवे माझ्या कार्यक्षेत्रात लुडबुड करत असल्याचा आरोप केला.

निमित्त निमंत्रण पत्रिकेेचे :
शिवसेना आयोजित गणेश महोत्सवाच्या पत्रिकेत आमदार शिरसाट, जैस्वाल माने यांची नावे नसल्याचे कारण पुढे करत आमदार शिरसाट यांनी शरसंधान केले. हे कारण तत्कालिक असून खरी कारणे लवकरच बाहेर येतील, अशी चर्चा आहे.

दानवे म्हणतात, माझ्यावरील आरोप खोटे
आमदार शिरसाट यांच्या आरोपांबाबत अंबादास दानवे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सारे आरोप खोटे आहेत. ते माझ्याशी कोणत्याही विषयावर कधीही बोलू शकतात. गणेश महोत्सवाच्या पत्रिकेत हास्य कविसंमेलनाचे आयोजक म्हणून शिरसाट यांचेच नाव आहे, आणि महानगरप्रमुखपद जिल्हाप्रमुखाच्या अखत्यारीत येते.
बातम्या आणखी आहेत...