आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena, Rashtrawadi, Regional Party Checking Voter Machine

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसलाच फक्त मतदान यंत्रांची चिंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्रांच्या तपासणीची चिंता नाही. कारण तीन दिवसांत दोन पक्ष वगळता अन्य राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या तपासणीकडे फिरकले नाहीत.

गुरुवारपासून ही तपासणी सुरू झाली. यंत्र तपासणीसाठी पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक पक्षाला देण्यात आले होते. मात्र पहिल्या दिवशी कोणीही इकडे फिरकले नाही. निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींना फोन करून उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्याचाही फायदा झाला नाही. गुरुवारी मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आले, त्यांनी किरकोळ पाहणी केली आणि लगेच ही मंडळी निघून गेली.

जिल्ह्यात या निवडणुकीसाठी 2577 मतदान केंद्रे ठेवण्यात येणार असून तेथे मिळून 3482 यंत्रे लागणार आहेत. येथे असलेल्या यंत्रांपैकी कोणत्याही यंत्राची तपासणी करण्याची सूचना पक्ष प्रतिनिधी करू शकतो. तपासणीनंतर यंत्रांना सील केले जाते. तपासणीदरम्यान निकाल पडताळणी करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

प्रत्येक मतदारसंघातील 18 यंत्रांची तपासणी होणार
पुढील शनिवारपर्यंत ही तपासणी चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 18 यंत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच हे यंत्र निवडणुकीसाठी योग्य, असा शिक्का मारला जाईल.