आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपद येताच विकास आराखड्यात शिवसेनेचा यूटर्न? पक्षप्रमुख निर्णय घेतील- चंद्रकांत खैरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विकास आराखडा तयार करताना अनागोंदी झालेली आहे. त्यामुळे तो नव्याने तयार करण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये, असे खासदार चंद्रकांत खैरे पूर्वी म्हणाले होते. परंतु आता महापौरपद स्वपक्षाकडे येण्याबरोबरच निकटवर्तीयाकडे आल्याने त्यांनी आपल्या जुन्या भूमिकेवरून यूटर्न घेतला. सोमवारी मनपात पत्रकारांशी बोलताना हा विषय निघाला असता, याबाबत काय भूमिका घ्यायची हे पक्षप्रमुख ठरवतील. आम्ही आत्ताच त्यावर काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी विषय संपवला. 
 
आराखड्याच्या वैधतेला स्थानिक नागरिकाने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर तेथे निकाल मनपाच्या विरोधात गेला. नव्याने विकास आराखडा तयार करावा, असे न्यायालयाने सांगितले होते. कारण विकास आराखड्यावर आयुक्तांची स्वाक्षरी नाही. तरीही तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात आयुक्त हे प्रतिवादी नाहीत. त्यामुळे त्यांनी शपथपत्र सादर करण्यास नकार दिला. तेव्हा महापौरांना शपथपत्र सादर करावे लागले. गतवर्षी माजी महापौर भगवान घडमोडे यांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केली तेव्हाही सेनेने विरोध केला होता. आता महापौर बदलले. नंदकुमार घोडेले यांच्या रूपाने महापौरपद शिवसेनेकडे आले. येत्या २४ नोव्हेंबरला या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हायची आहे. तेव्हा महापौर म्हणून पुन्हा शपथपत्र द्यावे लागेल. त्यामुळे आता सेनेची भूमिका काय, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, काय ते पक्षप्रमुख ठरवतील, असे सांगत भूमिका बदलल्याचे संकेत त्यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...