आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMC: महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपेंच्या नावावर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अौरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेली रस्सीखेच अखेर शनिवारी थांबली. दोन्ही मित्रपक्षांनी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चत करुन तोडगा काढल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौरपदासाठी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात थोड्याच वेळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

औरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेनेकडे 29 तर भाजपकडे 22 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असल्याने मागच्यासारखाच फाॅर्म्युला दिला होता, तर ताकद वाढल्याने भाजपने फिफ्टी-फिफ्टीचा फाॅर्म्युला दिला होता. एकमेकांच्या या प्रस्तावांबाबत दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी अंतिम निर्णय थोड्याच वेळात देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचा फाॅर्म्युला
महापौरपद: जागाजास्त असल्याने सेनेकडे
उपमहापौरपद: भाजपकडे
स्थायीसमिती सभापती : प्रत्येकवर्षी आलटून पालटून

भाजपचा फाॅर्म्युला
महापौरपद: अडीचवर्षे भाजप, अडीच वर्षे शिवसेना
उपमहापौरपद: अडीचवर्षे शिवसेना, पुढची अडीच वर्षे भाजप
स्थायीसमिती सभापती : प्रत्येकवर्षी आलटून पालटून

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 57 चा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना भाजपची धावाधाव सुरु...