आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsenaparti Chief Udhav Thackeray On Drought Tour At Marathwada

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शिवसेनेने जाहीर केली \'कन्यादान\' योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लांबणीवर पडलेला आपला दुष्काळ दौर्‍याला शनिवारी पोळ्याच्या मुहुर्तावर औरंगाबादेतून सुरु केला. केंद्र सरकारने राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा. बिहारप्रमाणे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शिवसेनेने 'कन्यादान योजना' जाहीर केली आहे. यापुढे शिवसेना शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार आहे.

'बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज, मग दुष्काळी महाराष्ट्रालाही द्या',अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्यात केली आहे. मांसाहाराचा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे, त्याच्यावर आम्ही पडदा टाकला आहे, कोणीही वाद चिघळवायचा प्रयत्न करू नये, अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवू शकते, असाही इशारा उद्धव यांनी यावेळी म्हटले आहे. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा, टीका करण्याऐवजी शेतकर्‍यांना मदत करून त्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे.', असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कन्यादान योजना राबवणार आहे. पीडित शेतकर्‍यांच्या मुलींचा खर्च यापुढे शिवसेना उचलणार आहे.

सरकार उपयायोजना करते. परंतु, त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. यासाठी शिवसेना प्रत्येक शहरात 'उभारी पथक' उभारणार आहे. उभारी पथकांतील कार्यकर्ते पीडित शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतील. शासनाच्या योजनांचा शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयन्न करतील, असेही उद्धव यांनी यावेळी सांगितले.