आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंकांसमोर शिवसेनेचे ढोल बजाओ; कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी देण्याची केली मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणाऱ्या बॅंकांसमोर शिवसेनेने आज ढोल बजाओ आंदोलन केले. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
 
सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी केली असून राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानुसार बॅंकांनी कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी राज्यभरातील बॅंकांसमोर शिवसेनेने ढोल बजाओ आंदोलन केले. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली या आठ जिल्ह्यात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...