आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांनंतर दारिद्र्यरेषेखालील बचत गटांना भाडेतत्त्वावर गाळ्यांचे वाटप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवना - सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत 10 गाळ्यांचे बांधकाम 1९९७-९८ ला पूर्ण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून हे गाळे शोभेची वास्तू बनले होते. त्यातच गाळेवाटपावरून आपसात होणा-या वादामुळे गाळेवाटपाचे काम आजपर्यंत थांबले होते.
मूलभूत सुविधा योजना (1९९७-९८) अंतर्गत बांधण्यात आलेल्या गाळ्यांना आज तब्बल 13 वर्षांनंतर सोन्याचे दिवस आले असून दारिद्र्यरेषेखालील बचत गटांना 11 महिन्यांच्या करारावर 1500 रुपये प्रतिमाह या भाडेतत्त्वावर देण्यात आले. दोन बचत गटांकडून दोन गाळे खुले करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे आणि आपसातल्या वादामुळे गेल्या 13 वर्षांत ग्रामपंचायतीचे लाखों रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. आज अवघ्या एका तपानंतर ग्रामपंचायतीकडून महात्मा जोतीबा फुले महिला बचत गट आणि वनराई महिला बचत गटांना दोन गाळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच मधुकर विखनकर, बाजार समितीचे अरुण पा.काळे, सदस्य सखाराम धनवई, मधुकर किसनराव काळे तसेच बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजगार मिळाला- ग्रामपंचायतीचे गाळे बचत गटांना देण्याचा निर्णय अत्यंत चांगला असून रोजगारास हातभार मिळाला आहे. तालुक्यात शिवना बाजारपेठ सर्वात मोठी असल्याने व्यवसायास गाळे फायदेशीर ठरणार आहेत. - कल्पना भागवत, अध्यक्ष, महात्मा फुले महिला बचत गट