आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग कामी आले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उपमहापौरपदी विराजमान झालेले प्रमोद राठोड हे व्यवसायाने अभियंते. पण आधी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले अन् अभियांत्रिकीच्या पदवीचा जणू त्यांना विसर पडला. त्यांनी व्यवसायात उडी घेतली. अल्पावधीतच यशस्वी उद्योजक म्हणूनही ते नावारूपास आले. मात्र इंजिनिअरिंगचा फायदा त्यांना राजकारणात पक्के बांधकाम करण्यास झाला.

पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. पाच वर्षांत त्यांचा वाॅर्ड आदर्शवत केला. त्या वाॅर्डातून ते पुन्हा जिंकणारच अशी परिस्थिती होती. परंतु ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना विश्रांतीनगर या नव्या वाॅर्डातून उमेदवारी मिळाली. स्वबळावर ते विजयी झाले. राजकारणातील अनुभव पणाला लावत त्यांनी फील्डिंग लावली अन् थेट उपमहापौरपदाची उमेदवारी मिळवली. हा भाजपतील जुन्या कार्यकर्त्यांसाठी धक्का होता. पण राजकारणात कशासाठी काय करावे, याची माहिती पुरेपूर असल्याने ते उपमहापौरपदी विराजमान झाले.

कार रेसिंगचा छंद
महाविद्यालयीन वेळेपासूनच राठोड यांना कार रेसिंगचा छंद आहे. राजकारणात व्यग्र झाल्यानंतरही त्यांनी तो पूर्णपणे सांभाळला आहे. आतापर्यंत चार वेळा ते हिमालयात कार रेसिंगसाठी गेले होते. आता उपमहापौरपदी असले तरी ते रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी जातीलच, यात शंका नाही.
बातम्या आणखी आहेत...