आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लघुपट निर्मिती’वरील कार्यशाळा 28 सप्टेंबरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान प्रयोग मालाड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवानिमित्त गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी एमजीएम जनसंवाद पत्रकारिता महाविद्यालय येथे सकाळी 9 ते दु. 2 वाजेदरम्यान लघुपट निर्मिती कार्यशाळा घेण्यात येणार आहे. 
 
२०१६ मध्ये कार्यशाळेच्या आयोजनातून पाच पुरस्कार प्राप्त लघुपट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. प्रसिद्ध समीक्षक, लेखक-दिग्दर्शक अशोक राणे या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन करतील. तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवर, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या कार्यशाळेत सहभागींसोबत संवाद साधतील. लघुपट म्हणजे नेमके काय,पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची अंगे, इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले या प्रमुख विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रथम येणाऱ्या शंभर व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे. 

अधिक माहितीसाठी (०२४०) २३५१७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोशाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकुंद भोगले, नीलेश राऊत, डॉ. रेखा शेळके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव यांनी केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...