आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मानवी भावनांचा कल्लोळ ते ज्वलंत सामाजिक प्रश्न अशा भिन्न विषयांवरच्या लघुपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘विठ्ठल’ या लघुपटाचाच गजर राहिला. रोटरॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित ‘क्लॅप’ लघुपट महोत्सवात देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या 27 लघुपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळाली. त्यात औरंगाबाद, लातूरसह मराठवाड्यातून 14 लघुपट दाखवण्यात आले.
रोटरॅक्ट क्लबच्या वतीने तिसरा ‘क्लॅप’ हा लघुपट महोत्सव रविवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ख्यातनाम नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते आणि लक्ष्मीकांत धोंड, ज्ञानदा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी अजित दळवी यांनी या नवोदित चित्रकर्मींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अडीच तासांचा चित्रपट किंवा कथाकथन या दीर्घ कलाप्रकारांतून जे सांगता येत नाही ते लघुपटाच्या माध्यमातून सांगता येते. हे अतिशय सशक्त माध्यम असून त्याचा वापर करून कलावंतांनी व्यक्त व्हायला हवे. या वेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण दाखले देत लघुपटांचे महत्त्व विशद केले. व्यासपीठावर विनय जोशी उपस्थित होते.
35 एंट्रीज, 27 चित्रपट : रोटरॅक्ट क्लबचे आशिष वाळिंबे म्हणाले की, या महोत्सवासाठी 35 प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी 27 लघुपट येथे दाखवण्यात आले. आसाम, पुणे, मुंबई, ठाणे यासोबतच औरंगाबाद, लातूर येथील लघुपटांचा त्यात समावेश आहे. चांगले लघुपट पाहायला मिळावे आणि मराठवाड्यातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे या हेतूने हा महोत्सव भरवला जातो. या एफटीआयच्या विद्यार्थ्यांचेही लघुपट होते.
हे लघुपट दाखवले
द रिव्हर फ्लोज, लाइफलेस हूड, कातळ, व्हॉट नेक्स्ट, डर, वतरुळ, कलर्स अंडर कोल, द हॅपिनेस, वन रिक्वेस्ट, व्हिसलिंग ऑफ द वूडस, मोटरबाइक, प्ले ग्राऊंड, विठ्ठल, मी मन आणि बुद्धी, पणती, द लास्ट डे, घड्याळाचा दवाखाना, पायताण, चालविसी हाती धरोनिया, पिस्तुल्या, आवेश, दॅटस कमिटमेंट, डी फोकस, फॉर अ स्माइल, अवर अनडुइंग, सेव्ह वॉटर-सेव्ह अर्थ, व्हॉट अबाउट अस.
औरंगाबादच्या कलावंतांचा सहभाग
औरंगाबादमधील रोहित देशमुख यांच्या व्हॉट अबाउट असने या महोत्सवाचा समारोप झाला. त्यांच्याशिवाय विश्वदीप करंजीकर, अनिकेत म्हस्के, अनिरुद्ध तुगावे या एमआयटी आणि र्शेयस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला फॉर अ स्माइल हा लघुपट, द हॅपिनेस आणि लातूरच्या अरुण बारसकर आणि त्यांच्या सहकार्यांचा मी मन आणि बुद्धी हे मराठवाड्यातील लघुपट लक्षणीय ठरले.
पाच हजारांतही होतो लघुपट
डिजिटल माध्यमे सर्वांच्याच हाताशी सहजगत्या उपलब्ध झाल्याने शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट तयार करण्याकडे तरुण कलावंतांचा ओढा वाढला आहे. छोटासा प्रसंग, घटना घेऊन त्याची सूत्रबद्ध पटकथा तयार करायची आणि मनाजोगते सादरीकरण असे प्रयोग हौशी कलावंत करताना दिसतात.
या ताकदवान माध्यमाचा अभ्यास करून ही कला विकसित करणार्यांची संख्या आता मराठवाड्यातही वाढत आहे. साधारणपणे पाच हजार रुपयांपासून लघुपट तयार करता येऊ शकतो. यात इतर बाबींपेक्षा कथेला अधिक महत्त्व असल्याने आणि कालावधी छोटा असल्याने असे प्रकल्प अनेक जण हाती घेत आहेत.
तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा शिरपेच!
आशियाई चित्रपट महोत्सव, फ्रान्समधील लिआँ चित्रपट महोत्सव, दुबई चित्रपट महोत्सव या आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गौरवला गेलेला आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवलेला ‘विठ्ठल’ हा 24 मिनिटांचा लघुपट सर्वांची मने जिंकून गेला. आजोबांच्या निधनामुळे मुंडण कराव्या लागणार्या आठ-दहा वर्षांच्या चिमुकल्या विठ्ठलची केस नसल्याने होणारी अवस्था या लघुपटात करण्यात आले आहे. अनिकेत रुमाडे या चिमुकल्याने साकारलेला विठ्ठल आणि अप्रतिम सादरीकरण असलेल्या या लघुपटाने सर्वांनाच अस्वस्थ केले. मुलाच्या आनंदासाठी संकटांना तोंड देत संघर्ष करणार्या पित्याची गोष्ट सांगणारा विश्वदीप करंजीकर, अनिकेत म्हस्के, अनिरुद्ध तुगावे या फॉर अ स्माइल हा लघुपटदेखील कौतुकाचा विषय ठरला.
लघुपटांना महोत्सवांचे व्यासपीठ उपलब्ध आहे. शिवाय पीव्हीआरसारखे एक्झिबिटरदेखील पुढाकार घेतात. यू ट्यूबसारखे माध्यम आहे. त्यामुळे लघुपट जगभर पोहोचतात. येथे कराल तेवढे कमीच आहे. अरुण बारसकर, कलावंत लातूर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.