आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटपुंज्या पगारामुळे कर्मचा-यांचा एसटीतून काढता पाय!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एमएसआरटीसी) मनुष्यबळाचा आधीच अभाव आहे. त्यातच कामाचा वाढता ताण आणि तुटपुंजे वेतन यामुळे कर्मचारी घायकुतीला आले आहेत. परिणामी वाहक आणि चालकांनी मंडळाचे सुकाणू सोडून लांब पल्ला गाठण्याचा मार्ग धरला आहे. इतर कंपन्यांप्रमाणेच नोकरी सोडून त्यांनी सरकारी मंडळांची वाट धरली आहे. दुसरीकडे मिळणाºया घसघशीत पगारामुळे एसटीत नव्याने नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांचे एनओसी मागण्याचे, तर जुन्या कर्मचा-यांचे स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रमाण महिन्याकाठी 35 ते 40 एवढे वाढले आहे.
औरंगाबाद विभागात सध्या 1 हजार 110 चालक आणि 1 हजार 97 वाहकांची गरज आहे. केवळ 1 हजार 23 चालक व 951 वाहक कार्यरत आहेत. 87 चालक व 46 वाहकांच्या कमतरतेमुळे कर्मचा-यांवर अतिरिक्त ताण आहे. बसेसची दयनीय अवस्था, त्यातच कामाचा ताण यामुळे ओव्हरटाइम मिळूनही हे चालक-वाहक अतिरिक्त काम करण्यास राजी नाहीत. राज्यभरातील सर्वच विभागांमध्ये चालक-वाहकांची कमतरता असून गरजेपेक्षा चालकांचे प्रमाण सरासरी 8.5 टक्के तर वाहकांचे 7.1 टक्के कमी आहे. औरंगाबाद विभागातील चालक - वाहकांची उणीव भरून काढण्यासाठी लातूर, परभणी, बीड, नांदेड आणि जालना विभागातून अतिरिक्त ठरलेले 41 चालक व 84 वाहक वर्गउर्वरित. पान 9

ही आहेत कारणे
तोटा घटवण्यासाठी 2008 पासून एसटीने नियुक्तीसाठी कनिष्ठ वेतनश्रेणीचा फॉर्म्युला लागू केला.
चालक-वाहकांना 2790 -3870 वेतनश्रेणी. पगार 3 हजार रुपये
महावितरण, जलसंपदा अथवा अन्य सरकारी विभागात चालकाचे वेतन 12 हजार रुपये असते.
एसटीच्या पगाराच्या तुलनेत ही तफावत 6 ते 7 हजार रुपये एवढी मोठी आहे.
डिसेंबरमध्ये महावितरणमध्ये सहायक आणि जलसंपदा विभागात चालकांची भरती सुरू झाली.
एसटी विभागातील 40 चालक- वाहकांचे ‘एनओसी’साठी अर्ज

औरंगाबाद विभागाची सद्य:स्थिती
सध्याची स्थिती
गरज
चालक
1023
1110
वाहक
951
1097

मनुष्यबळ कमीच
महावितरण, जलसंपदा विभागात चालकाला मिळणारे वेतन आणि एसटीमध्ये मिळणारे वेतन यात मोठी तफावत आहे. त्यामुळे संधी मिळताच चालक- वाहक सोडून जातात. कमी-अधिक फरकाने सर्वच विभागात चालक- वाहकांचे मनुष्यबळ गरजेपेक्षा कमी आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा ताण पडतो.
एस. डी. ओहोळ, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, औरंगाबाद विभाग