आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जवळील हर्सूल येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस भस्मसात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सावंगी (हर्सूल) येथील एक एकरवरील उसाला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून यात 1 लाखाचे नुकसान
झाले आहे. दिगंबर रामराव जगदाळे यांच्या शेतात ही घटना घडली.
औरंगाबादपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी गावात गट नंबर 180 मध्ये ही घटना घडली. दुपारी 2.30 वाजता शेतातील महावितरणच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली. काही वेळाने ही घटना शेतातील मजुराच्या लक्षात आली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थही आग विझवण्यासाठी धावले. दुपारी 3.30 वाजता आग आटोक्यात आली. याच वेळी अग्निशामक दलाचा बंबही दाखल झाला होता. मात्र, तोपर्यंत एक एकरवरील ऊस भस्मसात झाला होता. टंचाईच्या काळात कसाबसा जगवलेला ऊस जळाल्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच सजाच्या कर्मचार्‍यांनी व मी स्वत: घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी केली. महावितरणच्या पोलवर शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. शेतकर्‍यास त्वरित नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.’’
हसन सिद्दिकी, तलाठी, हर्सूल