आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११२ लेटलतिफांना कारणे दाखवा नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- झोन कार्यालयांत वेळेवर हजर राहणाऱ्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर अखेर मनपाने बडगा उगारला असून ११२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार आहेत. या नोटिशींना समाधानकारक उत्तर मिळाल्यास एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे.
गेल्या दहा दिवसांत महापौर त्र्यंबक तुपे यांना दोनदा लेटलतिफांचा अनुभव घ्यावा लागला. आधी वॉर्ड च्या कार्यालयात सकाळी भेटीच्या वेळी ना अधिकारी होते ना कर्मचारी. शेवटी वॉर्ड अभियंत्याच्या केबिनला कुलूप लावण्याची वेळ महापौरांवर आली होती. त्यानंतर वॉर्ड कार्यालयांतही कार्यालयीन वेळात तुरळक उपस्थितीचा नजारा त्यांना पाहायला मिळाला.
तेथे तर कार्यालयीन वेळेत कार्यालय रिकामे आणि कर्मचारी आवारात चकाट्या मारताना दिसून आले. हा प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने महापौरांनी आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे नंतर उपायुक्त किशोर बोर्डे यांना लेटलतिफ कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
आज आस्थापना विभागाने वर्ग च्या ६८ तर वर्ग च्या ४४ अशा एकूण ११२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांत नोटिसींना उत्तर द्यावे लागणार असून समाधानकारक उत्तर आल्यास या लेटलतिफांचा एक दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे. याबाबत महापौर तुपे म्हणाले की, नागरिकांची कामे व्हावीत यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येणार आहे.