आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shravan Special : Let's Visit Greenary Raneshwar Mahadev

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण विशेष: चला तर हिरव्यागार वनराईतील 'रणेश्वर महादेवा'ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या उत्तर दिशेला शंभर किमी अंतरावर सिल्लोड तालुक्यात रणेश्वर नावाचे सुंदर शिवालय आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे गावकरी सांगतात. अत्यंत सुंदर आखीवरेखीव काळ्या पाषाणातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर्शनाबरोबरच एक पर्यटनस्थळ म्हणूनही हे मंदिर पाहण्यासारखे आहे.

औरंगाबादपासून सिल्लोडच्या दिशेने निघाल्यावर सिल्लोडपासून दोन किमी अंतरावर हट्टी हे गाव लागते. इतर खेडेगावांसारखेच हेही गाव असले तरी या हिरव्या शेतांत रणेश्वराचा सुंदर अन् उंच कळस दिसतो. शेतातच महादेवाचे हे रणेश्वर मंदिर आहे. भव्य हेमाडपंती शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली ही वास्तू काळ्या पाषाणात बांधलेली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शंकर-पार्वतीची मूर्ती एकत्र पाहावयास मिळते. पूर्वी या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होता. पहिली केळणा नदी, तर दुसर्‍या नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे

सुंदर नक्षीकाम
मंदिराचा परिसर खूप मोठा असून प्रवेशद्वारही भव्यदिव्य असेच आहे. मंदिर बांधताना त्या काळातील कारागिरांनी खूप मेहनत घेतल्याचे दिसते. अत्यंत बारीक कोरीव काम त्यावर दिसते. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्ती त्यावर कोरलेल्या आहेत. मराठवाड्यातील हे एक वेगळे शिवालय आहे, मात्र मुख्य रस्त्यापासून थोडे आत असल्याने प्रसिद्धीपासून दूर आहे.