आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 21 पीठांपैकी वेरुळातील श्री गणेशाचे 17 वे पीठ लक्षविनायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ/औरंगाबाद - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळात आराध्य दैवत श्री गणेशाचे पुरातन देवालय आहे. तारकासुर या दैत्याचा वध करताना स्वामी कार्तिकेयाने स्वत: श्री गणेशाची आराधना करून येथे या गणपतीची स्थापना केली, असे मानले जाते. देशभरातील 21 गणेश पीठांपैकी हे 17 वे पीठ असून ते लक्षविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराण, गणेशपुराण आणि स्कंद पुराणातही या नवसाला पावणार्‍या स्थानाची माहिती आहे. फारशी प्रसिद्धी नसल्याने या मंदिराविषयी लोकांना विशेष माहिती नाही.

देशभरात पुराणकाळात देवांनी-ऋषी-मुनींनी तसेच काही संत महंतांनी स्थापन केलेली श्री गणेशाची 21 पीठे आजही सुस्थितीत आहेत. त्यातील आठ पीठे महाराष्ट्रात, तर मराठवाड्यात त्यातील तीन आहेत. त्यातील 17 वे पीठ आपल्या वेरूळ येथे आहे. गणेश चतुर्थीनिमित्त (9 सप्टेंबर) या दुर्लक्षित, पण तेवढय़ाच पुरातन मंदिराविषयी माहिती देत आहोत. घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून लक्षविनायकाचे मंदिर फक्त 2 किमी अंतरावर आहे. चारही बाजूंनी शेत आणि मधोमध हे देवालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नीरव शांतता असते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोर गणरायाचे वाहन उंदराची मूर्ती दिसते. आत सभामंडप व त्याही आत छोटा गाभारा आहे. त्यामध्ये लक्षविनायकाची साडेतीन फुटांची मूर्ती दिसते. मूर्तीचा एक हात मांडीवर, तर दुसर्‍या हातात मोदक दिसतो. वरच्या दोन हातांत आयुधे आहेत, पण ती स्पष्ट दिसत नाहीत.