आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीव सांभाळून हंड्या फोडा; औरंगाबादेत पोलिसांनी दिल्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहीहंडी महोत्सवात बक्षिसाच्या आमिषाला बळी पडू नका, जीव सांभाळून हंड्या फोडा, अशी सूचना पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांनी गोविंदा पथकांना केली आहे. सातव्या, आठव्या थरावर जाताना हूकचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी केले आहे. गोविंदा पथकांची विशेष बैठक जाधव यांनी बुधवारी घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, पथकातील सहभागी गोविंदाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याच सहकार्‍यांवर आहे. विविध भागातील दहीहंडी महोत्सवाच्या आयोजकांनी वेळेचे भान ठेवून दुपारपासूनच हा महोत्सव सुरू करावा आणि पथकांना आपले प्रदर्शन करण्याची संधी द्यावी. तेव्हा वेळापत्रकाचे नियोजन झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

ही घ्या काळजी
>दुचाकींवर न जाता मोठे वाहन वापरावे
>मद्यप्राशन करून गाड्या चालवू नयेत
>डॉक्टर आणि रुग्णवाहिका असावी
>सहा थरांच्या वर थर लावू नये

सुरक्षा महत्त्वाची
पोलिस प्रशासनाकडून थरांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. मात्र, दहीहंडी पथकांनी सुरक्षेचे भान ठेवून सात आणि आठव्या थरांवर जाताना हूकचा वापर करावा. रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची व्यवस्था करावी.
-संजयकुमार, पोलिस आयुक्त.
थर कमी केले
हंडी सात थरांवर आणली असून हेल्मेट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम तैनात असणार आहे. सुमीत खांबेकर, शहराध्यक्ष, मनसे